क्रिकेटचा देव म्हणून ओळखले जाणारे भारतीय क्रिकेट संघाचे माजी महान फलंदाज (God of Cricket) सचिन तेंडुलकर सध्या त्यांच्या मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या लग्नामुळे चर्चेत आहेत. सचिन तेंडुलकर यांनी नुकतीच पत्नी अंजली, मुलगा अर्जुन, मुलगी सारा आणि अर्जुनची होणारी पत्नी सानिया चांडोक यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान सचिन यांनी पंतप्रधान मोदींना अर्जुन आणि सानियाच्या विवाह समारंभाचे आमंत्रण दिल्याची माहिती समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून अर्जुन आणि सानियाच्या लग्नाबाबत चर्चा सुरू होती आणि आता या लग्नाच्या तयारीला वेग आल्याचे स्पष्ट होत आहे.

या भेटीचा फोटो सचिन तेंडुलकर (God of Cricket) यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. फोटोसोबत त्यांनी लिहिले की, अर्जुन आणि सानियाच्या लग्न समारंभाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आमंत्रित करण्याचा आम्हाला आनंद झाला. तरुण जोडप्याला आशीर्वाद आणि मार्गदर्शन दिल्याबद्दल त्यांनी मोदीजींचे आभारही मानले. या पोस्टनंतर सोशल मीडियावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
दरम्यान, सचिन तेंडुलकर यांनी यापूर्वी काँग्रेस पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी यांचीही भेट घेतली होती. पत्नी अंजलीसोबत त्यांनी सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ येथील निवासस्थानी भेट दिली असून, त्यांनाही अर्जुनच्या लग्नाचे आमंत्रण दिल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे अर्जुन तेंडुलकरचे लग्न राजकीय आणि सामाजिक वर्तुळातही चर्चेचा विषय ठरत आहे.
अर्जुन तेंडुलकरचा साखरपुडा सानिया चांडोक हिच्याशी आधीच झाला आहे. (God of Cricket) सानिया ही मुंबईतील प्रसिद्ध उद्योगपती रवी घई यांची नात असून, घई कुटुंब हॉस्पिटॅलिटी आणि फूड इंडस्ट्रीमध्ये मोठे नाव मानले जाते. इंटरकॉन्टिनेंटल हॉटेल्स आणि ब्रुकलिन क्रीमरी या लोकप्रिय आईस्क्रीम ब्रँडचे ते मालक आहेत. अर्जुन आणि सानियाचा साखरपुडा एका खाजगी समारंभात पार पडला होता, ज्यामध्ये केवळ जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी उपस्थित होती.
क्रिकेट कारकिर्दीबाबत (God of Cricket) बोलायचे झाले तर अर्जुन तेंडुलकर हा डावखुरा वेगवान गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू आहे. तो स्थानिक क्रिकेटमध्ये गोव्याचे प्रतिनिधित्व करत आहे. इंडियन प्रीमियर लीगमध्ये तो यापूर्वी मुंबई इंडियन्स संघाचा भाग राहिला असून, आगामी आयपीएल हंगामात तो लखनऊ संघाकडून खेळताना दिसणार आहे. शिक्षणाच्या बाबतीत अर्जुनने मुंबईतील धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले असून, त्यानंतर मुंबई विद्यापीठातून पदवी घेतली आहे. आता क्रिकेटसोबतच त्याच्या वैयक्तिक आयुष्यातील हा नवा टप्पा चाहत्यांसाठी उत्सुकतेचा विषय ठरत आहे.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी