मुंबई पोलिसांच्या माहितीनुसार, चित्रपट निर्माता-दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील घराबाहेर (Ranveer Singh) झालेल्या फायरिंग घटनेनंतर रणवीर सिंगला ही धमकी मिळाली आहे. एका अज्ञात व्यक्तीने व्हॉट्सअॅपवर वॉइस नोट पाठवत थेट धमकी देत मोठ्या रकमेची मागणी केली आहे. या धमकीनंतर रणवीर सिंगने तात्काळ पोलिसांना याबाबत माहिती दिली.

धमकीची माहिती मिळताच मुंबई पोलिसांनी (Ranveer Singh) त्वरित हालचाली सुरू केल्या. रणवीर सिंगच्या घराबाहेर अतिरिक्त सशस्त्र पोलीस तैनात करण्यात आले असून सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. वॉइस नोट पाठवणाऱ्या व्यक्तीचा शोध घेण्यासाठी सायबर सेल आणि गुन्हे शाखेची मदत घेतली जात आहे. पोलिसांकडून धमकीची गंभीरतेने चौकशी सुरू असून कॉल डिटेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत.

रणवीर सिंग (Ranveer Singh) आणि अभिनेत्री दीपिका पादुकोण ज्या सोसायटीत राहतात, त्या सोसायटीतील रहिवाशांनीही या घटनेबाबत चिंता व्यक्त केली आहे. मोठ्या संख्येने तैनात करण्यात आलेल्या सशस्त्र सुरक्षा रक्षकांमुळे सोसायटीतील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोसायटी प्रशासनाने याबाबत पोलिसांना पत्र लिहून आपली भूमिका मांडली आहे. एका बाजूला अभिनेत्याच्या सुरक्षेसाठी उपाययोजना केल्या जात असताना, दुसऱ्या बाजूला या वाढीव सुरक्षेमुळे रहिवाशांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होत असल्याचेही सांगण्यात येत आहे.

या दोन्ही घटनांमुळे मुंबईतील नामवंत कलाकारांच्या (Ranveer Singh) सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. रणवीर सिंगला आलेली धमकी आणि रोहित शेट्टी यांच्या घराबाहेर झालेली गोळीबाराची घटना यांचा काही संबंध आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.
दरम्यान, रणवीर सिंग आणि त्याच्या कुटुंबीयांची सुरक्षा सर्वोच्च प्राधान्य असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले असून, धमकी देणाऱ्याला लवकरच अटक केली जाईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी