उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाला १५ दिवस झाले आहेत.(decision) २८ जानेवारीच्या सकाळी पावणे नऊ वाजता अजित पवार यांचं विमान अपघातग्रस्त झालं. त्यावेळी अजित पवार मुंबईहून बारामतीला जात होते. अजित पवार यांच्या निधनानंतर व्हिएसआर व्हेंचर्स कंपनीबद्दल शंका व्यक्त केल्या गेल्या. अजित पवार याच कंपनीच्या विमानातून प्रवास करत होते. अजित पवार यांचे पुतणे, आमदार रोहित पवार यांनी परवा पत्रकार परिषद घेत व्हिएसआर कंपनीच्या कारभारावर अनेक प्रश्न उपस्थित केले.

अजित पवार व्हिएसआर कंपनीच्या मालकीच्या लियरजेट (decision)विमानातून प्रवास करत होते. या कंपनीची देखभाल दुरुस्ती, पायलट्सच्या शिफ्ट, विमानातून अवैधपणे सुरु असलेली पेट्रोल वाहतूक अशा अनेक गोष्टी रोहित पवार यांनी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडल्या. व्हिएसआर कंपनीच्या एका विमानाला २०२३ मध्ये मुंबई विमानतळावर अपघात झाला. त्या अपघाताचा चौकशी अहवाल अद्याप समोर आलेला नाही. या कंपनीवर EASA या आंतरराष्ट्रीय संघटनेनं कारवाई केलेली आहे. मग DGCA या कंपनीला पाठीशी का घालतेय, असा प्रश्न रोहित पवारांनी विचारला. आता याच कंपनीबद्दल धक्कादायक माहिती समोर आली आहे.
नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं डीजीसीए देशातील चार्टर(decision) कंपन्यांच्या विमानांचं स्पेशल ऑडिट करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यात १४ प्रमुख कंपन्यांचं स्पेशल ऑडिट करण्यात येणार आहे. आश्चर्याची बाब म्हणजे यात अजित पवार यांनी प्रवास केलेल्या विमानाच्या कंपनीचं नाव नाही. त्यामुळे या कंपनीला वाचवण्यात येत आहे, अशी शंका उपस्थित केली जात आहे. व्हिएसआर कंपनीत डीजीसीएचे अनेक माजी कर्मचारी काम करतात. त्यामुळे ही कंपनी अनेक पायदळी तुडवते, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता.डीजीसीएकडून केल्या जाणाऱ्या स्पेशल ऑडिटमध्ये विमानांची काटेकोर तपासणी केली जाणार आहे. विमानाची देखभाल कशी आहे, इंजिन आणि तांत्रिक बाबी कशा पद्धतीनं ठेवण्यात आल्या आहेत, नियमित तांत्रिक तपासणी होत आहे का, या मुद्द्यांवर डीजीसीएचा भर असेल.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?