छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची आणि मराठा साम्राज्याच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वैभवशाली इतिहासाची जागतिक स्तरावर नोंद झाली असून त्यांच्या काळातील 12 किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे. या मानांकनाचे अधिकृत प्रमाणपत्र आज महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी फ्रान्समधील पॅरिस येथे युनेस्कोच्या मुख्यालयात जाऊन स्वीकारले. या ऐतिहासिक क्षणामुळे महाराष्ट्रासह संपूर्ण देशात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.

‘मराठा मिलिटरी लँडस्केप्स ऑफ इंडिया’ या नावाने 11 जुलै 2025 रोजी (Chhatrapati Shivaji Maharaj) युनेस्कोच्या 47व्या अधिवेशनात हा महत्त्वपूर्ण निर्णय जाहीर करण्यात आला होता. सुमारे दीड वर्षांच्या प्रदीर्घ प्रक्रियेनंतर रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, खांदेरी आणि तामिळनाडूमधील जिंजी या किल्ल्यांचा समावेश जागतिक वारसा यादीत करण्यात आला. या किल्ल्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी दूरदृष्टीचा आणि स्थापत्यकौशल्याचा साक्षात्कार घडवून दिला आहे.

या मानांकनासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये मंत्री आशिष शेलार यांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) नेतृत्वाखाली महाराष्ट्र सरकारचे चार सदस्यीय प्रतिनिधीमंडळ पॅरिस येथे गेले होते. त्यांनी युनेस्कोसमोर तांत्रिक आणि धोरणात्मक सादरीकरण करून किल्ल्यांच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाची प्रभावी मांडणी केली होती. त्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून आता अधिकृत प्रमाणपत्र स्वीकारण्यात आले आहे.

या सन्मानाच्या प्रसंगी मंत्री शेलार यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) वारशाचा जागतिक गौरव झाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे मार्गदर्शन आणि सहकार्याबद्दल आभार मानले. तसेच भारताचे युनेस्कोमधील स्थायी प्रतिनिधी विशाल शर्मा यांच्या प्रयत्नांचेही त्यांनी कौतुक केले. हा क्षण महाराष्ट्रासाठी, देशासाठी आणि शिवप्रेमींसाठी अत्यंत अभिमानास्पद असल्याचे त्यांनी नमूद केले.

दरम्यान, भारताच्या संविधानाला 75 वर्षे पूर्ण झाल्याच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अर्धपुतळा युनेस्को मुख्यालयाला भेट दिला आहे. 26 नोव्हेंबर 2025 रोजी संविधान दिनानिमित्त या पुतळ्याची स्थापना पॅरिस येथे करण्यात आली. सामाजिक न्याय, समानता, बंधुता आणि शिक्षणाद्वारे सक्षमीकरण या डॉ. आंबेडकरांच्या विचारांची जागतिक स्तरावर दखल घेतली जात असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. मंत्री आशिष शेलार यांनी पॅरिसमधील या स्मारकाला अभिवादन केले. यावेळी विभागाचे सचिव किरण कुलकर्णी, पुरातत्त्व विभागाचे सहाय्यक संचालक हेमंत दळवी आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?