मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर १० फेब्रुवारीची पहाट एका विलक्षण (Airport) घटनेची साक्षीदार ठरली. मिनिटा-मिनिटाला देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांची लगबग, प्रवाशांची वर्दळ आणि तपासणीची धावपळ यामध्ये अचानक एक वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग उद्भवला आणि संपूर्ण यंत्रणा सतर्क झाली. आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गिकेतून प्रवास करणाऱ्या टांझानियाच्या २६ वर्षीय गर्भवती महिलेला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या.

सकाळी सुमारे ५.१७ वाजता विमानतळाच्या वैद्यकीय (Airport) पथकाला तातडीचा कॉल आला. संबंधित महिला सुमारे ३६ आठवड्यांची गर्भवती होती. गर्भजल पिशवी फुटल्याने आणि वाढत्या प्रसूती कळांमुळे कोणत्याही क्षणी प्रसूती होऊ शकते, हे लक्षात येताच वैद्यकीय पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून डॉक्टरांनी त्वरित निर्णय घेत महिलेला सुरक्षितरीत्या रुग्णालयात हलवण्याची तयारी सुरू केली.

विमानतळ कर्मचाऱ्यांनी महिलेला स्ट्रेचरवर (Airport) हलवून रुग्णवाहिका बग्गीद्वारे एअरसाईड अँब्युलन्सपर्यंत पोहोचवले. या संपूर्ण प्रक्रियेत एअरलाईन कर्मचारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) महत्त्वाचे सहकार्य केले. टर्मिनल प्रशासनाने स्थलांतर अधिकाऱ्यांशी समन्वय साधत तात्पुरता प्रवासी व्हिसा तत्काळ मंजूर करून घेतला, ज्यामुळे कोणताही प्रशासकीय अडथळा निर्माण झाला नाही.

सुमारे ५.४० वाजता रुग्णवाहिका रुग्णालयाच्या दिशेने रवाना झाली. मात्र, शहरातील (Airport) पहाटेच्या वाहतुकीतून मार्ग काढत असतानाच महिलेची प्रसूती प्रत्यक्षात सुरू झाली. ऑपरेशन थिएटर किंवा अतिरिक्त वैद्यकीय सुविधा नसतानाही विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने धावत्या रुग्णवाहिकेतच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. डॉक्टरांनी शांतपणे आणि दक्षतेने महिलेला योग्य स्थितीत ठेवत प्रसूती प्रक्रिया सुरू ठेवली.

काही मिनिटांतच बाळाचे डोके दिसू लागले (Airport) आणि सकाळी ५.४५ वाजता रुग्णवाहिकेतच एका गोंडस मुलीचा जन्म झाला. मुंबई शहर जागे होत असतानाच अँब्युलन्समध्ये बाळाच्या रडण्याचा आवाज घुमला आणि उपस्थित सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकला. डॉ. कृतिका, डॉ. मधु आणि डॉ. किसले यांच्या नेतृत्वाखालील पथकाला परिचारिका माधुरी, अशोक आणि रुग्णवाहिका चालक ओंकार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

सकाळी ५.५५ वाजेपर्यंत माता आणि नवजात बालिकेला (Airport) रुग्णालयाच्या आपत्कालीन कक्षात दाखल करण्यात आले. दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले. घरापासून हजारो किलोमीटर दूर, प्रवासादरम्यान आलेल्या या अनपेक्षित प्रसंगात मुंबई विमानतळाच्या वैद्यकीय आणि प्रशासकीय यंत्रणेने दाखवलेली तत्परता आणि समन्वय यामुळे एका नव्या जीवाचे सुरक्षित आगमन शक्य झाले. अदाणी विमानतळ होल्डिंग्ज लिमिटेडच्या उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडच्या कार्यक्षमतेचे हे एक भावनिक आणि प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?