उदयपुरमध्ये एका खाजगी कंपनीत कार्यरत मॅनेजर पदावर (removed) असलेल्या तरुणीवर घडलेली खळबळजनक घटना समोर आली आहे. या घटनेत कंपनीचे सीईओ, महिला एक्झिक्युटिव्ह हेड आणि तिचा पती यांच्यावर चालत्या गाडीत सामूहिक बलात्कार करण्याचा गंभीर आरोप आहे. पीडितेने सांगितले की बलात्कारानंतर तिच्या काही व्यक्तिगत वस्तू जसे की मोजे, इअरिंग आणि अंडरगारमेंट्स गायब केले गेले.घटनेचा तपशील पाहता, २० डिसेंबर २०२५ च्या रात्री उदयपुरच्या शोभागपुरा परिसरातील एका हॉटेलमध्ये कंपनीच्या सीईओच्या वाढदिवसाच्या आणि नवीन वर्षाच्या पार्टीचे आयोजन केले गेले होते. पीडिता रात्री सुमारे ९ वाजता पार्टीत पोहोचली होती. पार्टीत अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते आणि वातावरण उत्साही होते. रात्री सुमारे १:३० वाजेपर्यंत पार्टी सुरु होती.

पार्टी संपल्यानंतर पीडितेची तब्येत बिघडल्याने तिला घरी सोडण्याची तयारी चालू होती, (removed)पण महिला एक्झिक्युटिव्ह हेडने ‘आफ्टर पार्टी’साठी तिला गाडीत बसवले. गाडीत आधीपासूनच सीईओ आणि महिला हेडचा पती उपस्थित होते.पीडितेच्या तक्रारीनुसार, रस्त्यात गाडी एका दुकानाजवळ थांबली आणि तिला काही पाजण्यात आले ज्यामुळे ती पूर्णपणे बेशुद्ध झाली. नंतर चालत्या गाडीत आरोपींनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. सकाळी सुमारे ५ वाजता तिला तिच्या घराबाहेर सोडण्यात आले. जाग आल्यावर तिला आपल्या शरीरावर जखमा आणि मारल्याच्या खुणा आढळल्या.

घटनेचा महत्त्वाचा पुरावा म्हणून पीडितेने गाडीच्या डॅशकॅमची (removed)ऑडिओ-व्हिडिओ रेकॉर्डिंग तपासली, ज्यात आरोपींचे सर्व कृत्य आणि बोलणे कैद झाले आहेत. ही रेकॉर्डिंग पोलिसांसाठी प्रायमरी एविडन्स ठरली आहे. पीडितेने २३ डिसेंबरला महिला ठाण्यात तक्रार नोंदवली. तपास महिला अपराध अन्वेषण सेलच्या एएसपी माधुरी वर्मांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे. वैद्यकीय तपासणी झाली असून, डॅशकॅमची फॉरेन्सिक तपासणीसाठी जप्त करण्यात आली आहे.

हेही वाचा :

महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?

लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर

कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!Edit