कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी

पुढील महिन्यात होणार असलेली कोल्हापूर महानगरपालिकेची सार्वत्रिक (Corporation)निवडणूक ही महापालिका निवडणुकीच्या इतिहासातील सर्वाधिक खर्चाची ठरणार आहे. चार प्रभागांचा मिळून एक प्रभाग केल्यामुळे मतदार संघ विस्तारित झालेला आहेआणि म्हणूनच निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराचा खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. उमेदवारांना कोटीची उड्डाणे करावी लागणार आहेत.उमेदवारांचा एकत्रित खर्च किमान 300 कोटीवर जाण्याची शक्यता आहे.कोल्हापूर महापालिकेची सदस्य संख्या 81 आहे. शहराच्या 20 प्रभागातून या सदस्यांना निवडून द्यावे लागणार आहे. विशेष म्हणजे कोल्हापूर उत्तर आणि कोल्हापूर दक्षिण हे दोन विधानसभा मतदारसंघाच महापालिका परिक्षेत्रात येतात. या दोन्ही विधानसभा मतदारसंघात महायुतीचे आमदार आहेत. एकनाथ शिंदे शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आणि भारतीय जनता पक्षाचे आमदार अमल महाडिक तसेच महाविकास आघाडीचे विधानपरिषद गटनेते सतेज पाटील यांचा या निवडणुकीत कस लागणार आहे.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ खासदार धनंजय महाडिक, (Corporation)यांच्यावर महायुतीच्या नेत्यांनी कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीची जबाबदारी टाकली आहे.ही निवडणूक पक्षीय पातळीवर होते आहे आणि पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवणाऱ्या प्रत्येक उमेदवाराला पक्षाकडून निवडणूक खर्चासाठी अर्थ सहाय्य हवे आहे. अशा प्रकारचे अर्थसहाय्य मिळाले तरच उमेदवारांना ही निवडणूक लढवणे आर्थिक दृष्ट्या सुसह्य होणार आहे. अर्थात त्याला आपल्याच खिशातून सर्वाधिक पैसा काढावा लागणार आहे.एका मतदाराला चार मते देण्याचा अधिकार पहिल्यांदाच मिळत असल्यामुळे बऱ्याच मतदारांनी प्रत्येक उमेदवाराकडून”पाकिटा”ची अपेक्षा धरली आहे. हे सुद्धा या निवडणुकीच्या निमित्ताने पहिल्यांदाच घडताना दिसते आहे.

प्रत्येक प्रभागात किमान 50 छोटी मोठी सार्वजनिक तरुण मंडळे आहेत.(Corporation)या प्रत्येक मंडळाला उमेदवारांच्याकडून आत्तापासूनच खुश ठेवले जात आहे. याशिवाय मंडळासाठी म्हणून कार्यकर्त्यांना भरीव देणगी अपेक्षित आहे. प्रभागातील प्रत्येक मंडळा च्या कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवाराला संगीत भोजनावळीचे नियोजन आणि आयोजन करावे लागते आहे.प्रचारक फेरीतील कार्यकर्त्यांना अल्पोपहारआणि पाचशे रुपये द्यावे लागतात. उमेदवारांची छापील पत्रके निवेदने प्रभागातील प्रत्येक घरामध्ये पोहोचवण्यासाठी पेड कार्यकर्ता घ्यावा लागतो आहे.

महायुती, महाविकास आघाडी, वंचित आघाडी आणि आता (Corporation)महापालिकेच्या निवडणुकीच्या आखाड्यात आमदार विनय कोरे यांच्या जनसुराज्य शक्ती पक्षाने हीपदार्पण केले आहे. काही वर्षांपूर्वी जनसुराज्य शक्ती पक्षाचा या महापालिकेवर महापौर होता.प्रत्येक प्रभागात चार पॅनल्स गृहीत धरली तर पक्षीय उमेदवारांची संख्या 16 होते. म्हणजे एकूण उमेदवारांची संख्या 320 पर्यंत जाते. आणि खर्चाचा आकडा 250 ते 300 कोटीवर जाऊ शकतो.म्हणूनच कोल्हापूर महापालिकेच्या गेल्या 47 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासातील यंदाची निवडणूक सर्वाधिक खर्चाची ठरणार आहे

हेही वाचा :

नागरिकांनो सावधान! हिवाळ्यात वाढतेय पाठदुखीची समस्या, अशी घ्या काळजी

ऐन निवडणुकीत राज्य मंत्रिमंडळाचे सर्वात 4 मोठे निर्णय; चौथ्या निर्णयाने सगळेच अवाक्!

राज- उद्धव ठाकरेंच्या युतीवर संजय राऊतांच मोठं भाष्य! म्हणाले…