कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
हिंदूंच्या मताप्रमाणेच मुस्लिमांची मते सुद्धा वळवण्याचा प्रयत्न अगदी (elections)भारतीय जनता पक्षांनेसुद्धा
काही ठिकाणी केला आहे. महाविकास आघाडीचा घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाने सर्वोच्च महानगरांमध्ये मुस्लिम उमेदवारांना निवडणूक आखाड्यात उतरवले आहे. त्या पाठोपाठ उद्धव ठाकरे यांची शिवसेना, एकनाथ शिंदे यांची शिवसेना, अजितदादा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस, यांनीही मुस्लिम उमेदवारांना तिकीट दिले आहे.कोल्हापूर शहरातही अनेक धनदांडग्या मुस्लिम उमेदवारांना निवडणूक आखाड्यात उतरवले गेले आहे. काही प्रभागांमधील मुस्लिम उमेदवारांची संख्या पाहून काही कडव्या हिंदुत्ववादी मंडळींच्याकडूनसोशल मीडिया वरून टीका टिपणी सुरू आहे. त्याला राजकारणातली सोय पाहून
समर्थन किंवा विरोध होताना दिसतो आहे.बांगलादेशातील सध्याच्या हिंदू विरोधी वातावरणाचा उपयोग या निवडणुकीत घेतला जाणार आहे. त्यासाठीच सोशल मीडियावर क्लिप च्या माध्यमातून बांगलादेशातील घडामोडी मोठ्या प्रमाणावर व्हायरल केल्या जाऊ लागल्या आहेत.

प्रभागात ज्या समाजाची मते जास्त आहेत त्याच समाजातील (elections)व्यक्तीला राजकीय पक्षांकडून उमेदवारी देण्याबद्दलचा विचार केला जाऊ लागला आहे. अर्थात जातीचे आणि धर्माचे कार्ड या निवडणुकीत ओपन केले जाऊ लागले आहे.निम्न शहरी मतदारांचा कौल अर्थात नगरपालिका,नगरपरिषदा आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीत घेतला गेल्यानंतर राज्यातील महानगरांचा कौल राजकीय पक्षांकडून घेतला जातो आहे.त्यासाठी मतांच्या ध्रुवीकरणाचा प्रयोग सर्वच राजकीय पक्षांकडून केला जातो आहे, त्यामध्ये भारतीय जनता पक्ष आघाडीवर आहे.मुंबई महापालिकेसह काही महत्त्वाच्या महापालिका क्षेत्रामध्ये उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेनाया दोन्ही राजकीय संघटनांकडून मराठी मतांचे ध्रुवीकरण केले जाते आहे.मुंबई, कल्याण डोंबिवली, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगरया महानगरामध्ये ठाकरे बंधू कडून गेल्या काही महिन्यांपासून मराठीच्या मुद्द्याला मोठ्या प्रमाणावर चर्चेत आणले गेले आहे.
शालेय शिक्षणात हिंदी भाषेची सक्ती आणण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांच्याकडून केला (elections)गेल्यानंतर मराठी भाषा हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी आणला गेला.तर याच महानगरांमध्ये परप्रांतीय, अल्पसंख्यांक असलेला जैन समाज, हिंदी भाषिक यांना कोणत्या ना कोणत्या कारणातून स्वतःकडे खेचण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाने केला आहे. मुंबईतील कबूतरखाने या सामाजिक विषयातून मतांचे ध्रुवीकरण पद्धतशीरपणे केले गेले आहे. ठाकरे बंधूंना एक प्रकारे शह देण्याचा हा प्रयत्न दिसतो आहे.सध्या भारताचा शेजारी असलेल्या बांगलादेशात अस्थिर वातावरण आहे. तेथील हिंदू आणि हिंदू मंदिरांवर कट्टर पंथीय मुस्लिम संघटनांकडून हल्ले सुरू आहेत. संयुक्त राष्ट्र संघाने ही याबद्दल चिंता व्यक्त केली आहे. तेथील घटनांचे पडसाद भारतातील काही शहरांमध्येपडताना दिसत आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही त्यावर कठोर भाष्य केले आहे.

शेजारच्या देशातील या घटकांचा सुद्धा परिणाम महापालिकांच्या (elections)निवडणुकांवर काहीशा ध्रुवीकरणाच्या माध्यमातून होणार आहे.वंचित, उपेक्षित, घटकांची विशेषतः बारा बलुतेदार आणि अठरा अलुतेदार, तसेच दलित यांची मते खेचण्यासाठी काही प्रमुख राजकीय पक्षांनी सोशल इंजिनियरिंग चा प्रयोग केलेला आहे. वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर तसेच आरपीआय आठवले गटाचे विद्यमान केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना या निवडणुकीत महत्त्व येणे स्वाभाविक आहे. महाविकास आघाडी कडून वंचितला आणि तसेच महायुतीकडून आठवले गटाला जागा सोडल्या गेल्या आहेत. हा सुद्धा मतांच्या ध्रुवीकरणाचाच एक भाग आहे.
हेही वाचा :
महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?
लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!