टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारताने नामिबियाविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यात (T20 World Cup) दमदार सुरुवात केली आणि या सुरुवातीचा खरा शिल्पकार ठरला तो इशान किशन. अभिषेक शर्मा प्रकृती अस्वस्थतेमुळे या सामन्यात खेळू शकला नाही, मात्र त्याची कमतरता इशानने अजिबात जाणवू दिली नाही. मैदानात उतरल्यापासूनच त्याने नामिबियाच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला आणि आक्रमक फलंदाजीचे अप्रतिम दर्शन घडवले.

इशान किशनने अवघ्या 20 चेंडूत अर्धशतक झळकावत (T20 World Cup) आपला जबरदस्त फॉर्म दाखवून दिला. 5 चौकार आणि 4 षटकारांच्या जोरावर त्याने 50 धावांचा टप्पा गाठला तेव्हा त्याचा स्ट्राईक रेट तब्बल 250 होता. त्याच्या धडाकेबाज खेळीमुळे भारताने पॉवर प्लेमध्ये फक्त 1 गडी गमावून 86 धावा चोपल्या आणि सामन्यावर सुरुवातीपासूनच पकड मजबूत केली.
यानंतरही इशान थांबला नाही. त्याने 24 चेंडूत 61 धावा करत संघाला भक्कम (T20 World Cup) पायाभरणी करून दिली. या खेळीत त्याने 6 चौकार आणि 5 षटकारांची आतषबाजी केली. त्याचा अंतिम स्ट्राईक रेट 254.17 इतका होता, जो त्याच्या आत्मविश्वासपूर्ण आणि निर्भय फलंदाजीचा पुरावा होता. त्याच्या प्रत्येक फटक्यावर प्रेक्षकांनी जल्लोष केला आणि सोशल मीडियावरही त्याच्या खेळीची जोरदार चर्चा रंगली.
टी20 वर्ल्डकपच्या इतिहासात भारताकडून (T20 World Cup) झळकलेले हे पाचवे जलद अर्धशतक ठरले आहे. यापूर्वी 2007 मध्ये युवराज सिंगने 12 चेंडूत अर्धशतक ठोकत विक्रम केला होता. त्यानंतर केएल राहुलने 2021 मध्ये 18 चेंडूत, रोहित शर्माने 2024 मध्ये 19 चेंडूत आणि युवराजनेच 2007 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 20 चेंडूत अर्धशतक झळकावले होते. आता इशान किशनने 20 चेंडूत अर्धशतक करत या यादीत आपले नाव नोंदवले आहे.
इशानने तिलक वर्मासोबत दुसऱ्या विकेटसाठी 79 धावांची महत्त्वपूर्ण (T20 World Cup) भागीदारीही उभी केली. विशेष म्हणजे या भागीदारीत इशानचा मोठा वाटा होता. त्याच्या एकट्याच्या 59 धावांनी भारताला मोठ्या धावसंख्येकडे नेण्याचा मार्ग सुकर केला. एकूणच, इशान किशनची ही तुफानी खेळी टीम इंडियासाठी आत्मविश्वास वाढवणारी ठरली आणि आगामी सामन्यांसाठी मजबूत संदेश देऊन गेली.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?