यंदाच्या टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना पुन्हा एकदा (T20 World Cup) रंगणार असल्याने क्रिकेटविश्वात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. काही दिवसांपूर्वी या सामन्याबाबत अनिश्चितता होती. मात्र आयसीसी, यजमान देश आणि संबंधित क्रिकेट मंडळांदरम्यान झालेल्या चर्चेनंतर अखेर हा बहुप्रतिक्षित सामना निश्चित झाला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाची लाट उसळली आहे.

भारत-पाकिस्तान सामना हा केवळ क्रिकेटपुरता (T20 World Cup) मर्यादित राहत नाही, तर तो आर्थिकदृष्ट्याही मोठा सोहळा ठरतो. अंदाजानुसार अशा एका सामन्यातून तब्बल 2200 ते 4500 कोटी रुपयांपर्यंत उलाढाल होऊ शकते. या कमाईत सर्वात मोठा वाटा टीव्ही आणि डिजिटल प्रसारण हक्कांचा असतो. दोन्ही देशांतील तसेच जगभरातील प्रेक्षकसंख्या लक्षात घेता या सामन्याचे प्रसारण दर विक्रमी पातळीवर पोहोचतात.

जाहिरातींच्या दरांमध्येही प्रचंड वाढ दिसून येते. प्राईम टाईममध्ये (T20 World Cup) अवघ्या 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी 25 ते 40 लाख रुपये आकारले जाऊ शकतात. सामन्याच्या व्ह्यूअरशीप, ऑनलाइन स्ट्रिमिंगवरील प्रेक्षकसंख्या आणि ब्रँड व्हॅल्यू यावरून हे दर ठरवले जातात. एकट्या भारतातूनच जाहिरातींच्या माध्यमातून सुमारे 2500 कोटी रुपयांची कमाई होण्याचा अंदाज व्यक्त केला जातो.
मैदानावरील तिकीटविक्री देखील मोठ्या उत्पन्नाचे साधन ठरते. भारत-पाकिस्तान सामना कुठेही आयोजित केला गेला तरी तिकिटांसाठी प्रचंड मागणी असते आणि ती काही मिनिटांतच विकली जातात. तिकीटांचे दर इतर सामन्यांच्या तुलनेत अधिक असले तरी चाहत्यांचा उत्साह कमी होत नाही.

याशिवाय सामन्याच्या निमित्ताने संबंधित शहरातील हॉटेल्स, पर्यटन आणि वाहतूक (T20 World Cup) क्षेत्रालाही मोठा फायदा होतो. सामना असलेल्या दिवशी हॉटेल्सचे दर मोठ्या प्रमाणात वाढतात आणि एका रात्रीचे भाडे लाखांच्या घरात जाते. विमानप्रवासाचे दरही दुपटी-तिपटीने वाढतात. त्यामुळे केवळ क्रिकेट बोर्डांनाच नव्हे, तर स्थानिक अर्थव्यवस्थेलाही या सामन्याचा मोठा आर्थिक लाभ होतो.
एकूणच भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हा क्रीडारसिकांसाठी रोमांचक असतोच, पण त्याचबरोबर तो हजारो कोटी रुपयांची उलाढाल घडवून आणणारा आर्थिक महाउत्सव ठरतो.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?