टी-२० विश्वचषक २०२६ मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यातील महासंग्राम (T20 World Cup) अखेर नियोजित वेळेनुसार होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. पाकिस्तान सरकारने आपला पूर्वीचा निर्णय बदलत भारताविरुद्ध खेळण्यास हरकत नसल्याचे जाहीर केल्याने क्रिकेटविश्वात उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे १५ फेब्रुवारी २०२६ रोजी कोलंबो येथे हा बहुप्रतीक्षित सामना रंगणार आहे. आशिया कपच्या फायनलनंतर प्रथमच हे दोन पारंपरिक प्रतिस्पर्धी आमनेसामने येत असल्याने चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

कोलंबोतील हवामान मात्र चर्चेचा विषय ठरले आहे. हवामान (T20 World Cup) खात्याच्या अंदाजानुसार १२ ते १४ फेब्रुवारी दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता आहे. १५ फेब्रुवारी रोजी दिवसभर सुमारे १७ टक्के पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. वाऱ्याचा वेग २८ किमी प्रतितासपर्यंत जाऊ शकतो. मात्र सायंकाळी सामन्याच्या वेळेत पावसाची शक्यता कमी असल्याने सामना पूर्णपणे पार पडण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींना दिलासा मिळाला आहे.

टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारत आणि पाकिस्तान (T20 World Cup) यांच्यात आतापर्यंत १३ सामने झाले असून त्यापैकी १० सामने भारताने जिंकले आहेत, तर पाकिस्तानला तीन विजय मिळाले आहेत. मागील आशिया कपमध्येही भारताने पाकिस्तानविरुद्ध सलग विजयांची नोंद केली होती. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ विजयी मालिका कायम राखण्याच्या निर्धाराने मैदानात उतरणार आहे, तर पाकिस्तान संघ मागील पराभवाचा बदला घेण्यासाठी सज्ज आहे.

भारतीय संघाचे नेतृत्व सूर्यकुमार यादव करणार (T20 World Cup) असून संघात अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, हार्दिक पांड्या, अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती, कुलदीप यादव, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर आणि रिंकू सिंग यांचा समावेश आहे. पाकिस्तान संघाचे नेतृत्व सलमान अली आगा यांच्याकडे असून अबरार अहमद, बाबर आझम, फहीम अश्रफ, फखर जमान, ख्वाजा मोहम्मद नफे, मोहम्मद नवाज, मोहम्मद सलमान मिर्झा, नसीम शाह, साहिबजादा फरहान, सईम अयुब, शाहीन शाह आफ्रिदी, शादाब खान, उस्मान खान आणि उस्मान तारिक हे खेळाडू संघात आहेत.

दोन्ही संघांची ताकद, खेळाडूंची सध्याची (T20 World Cup) कामगिरी आणि कोलंबोतील हवामान यामुळे हा सामना अधिकच रंगतदार होणार आहे. क्रिकेटप्रेमींसाठी हा केवळ सामना नसून प्रतिष्ठेची लढत ठरणार आहे. १५ फेब्रुवारीला कोलंबोमध्ये पुन्हा एकदा भारत-पाकिस्तान क्रिकेटची थरारक कहाणी रंगणार आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?