आयसीसी मेन्स टी-20 वर्ल्ड कपमध्ये उद्या 15 फेब्रुवारी रोजी भारत आणि पाकिस्तान (T20 World Cup) यांच्यात होणाऱ्या बहुप्रतिक्षित सामन्यामुळे क्रिकेटविश्वात प्रचंड उत्साह निर्माण झाला आहे. श्रीलंकेतील कोलंबो येथील आर. प्रेमदासा स्टेडियम येथे रंगणाऱ्या या हाय-व्होल्टेज लढतीसाठी दोन्ही देशांतील हजारो चाहते आधीच कोलंबोमध्ये दाखल झाले असून आणखी अनेक जण रवाना होत आहेत. श्रीलंकेतील स्थानिक नागरिकांमध्येही या सामन्याबद्दल उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

भारत-पाकिस्तान सामना म्हटला की रोमांच, स्पर्धा आणि (T20 World Cup) भावनांचा उद्रेक हे समीकरण ठरलेलेच असते. यंदाही त्याला अपवाद नाही. या सामन्याच्या प्रचंड व्ह्यूअरशीपचा अंदाज घेत जाहिरातदारांनी मोठी गुंतवणूक करण्यास सुरुवात केली आहे. इंडस्ट्री तज्ज्ञांच्या मते, या सामन्यासाठी 10 सेकंदांच्या टीव्ही जाहिरातीचा दर तब्बल 30 ते 40 लाख रुपयांपर्यंत पोहोचला आहे. साधारण वर्ल्ड कप सामन्यांदरम्यान हा दर 20 ते 25 लाखांच्या आसपास असतो. शेवटच्या टप्प्यात जाहिरात दरात 20 ते 25 टक्क्यांनी वाढ झाल्याचेही सांगितले जात आहे. सामना सुरू असताना प्रत्येक सेकंद विक्रीसाठी महत्त्वाचा ठरणार असून ब्रॉडकास्टर JioStar ला संपूर्ण स्पर्धेतून सुमारे 2000 कोटी रुपयांची जाहिरात महसूल मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
डिजिटल प्लॅटफॉर्मवरही जाहिरातींचे दर झपाट्याने (T20 World Cup) वाढले आहेत. JioHotstar वर 10 सेकंदांचा जाहिरात स्लॉट 15 ते 20 लाख रुपयांपर्यंत गेला आहे. ऑटोमोबाईल, एफएमसीजी, फायनान्स, विमा आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील कंपन्यांनी मोठ्या प्रमाणावर जाहिरात स्लॉट बुक केले आहेत. या स्पर्धेत जाहिरात देणाऱ्या ब्रँडमध्ये Emirates, Amul, OpenAI, Hyundai, Mahindra & Mahindra आणि Britannia यांसारख्या मोठ्या नावांचा समावेश आहे. मार्केटिंग तज्ज्ञांच्या मते, या सामन्यातील जाहिरात दरांची तुलना थेट सोन्या-चांदीच्या भावाशी केली जात आहे.
दरम्यान, या सामन्याचा परिणाम पर्यटन आणि प्रवास क्षेत्रावरही (T20 World Cup) स्पष्टपणे दिसून येत आहे. ट्रॅव्हल प्लॅटफॉर्म EaseMyTrip च्या माहितीनुसार, भारतातून कोलंबोला जाणाऱ्या राउंड ट्रिप विमानभाड्यात सामान्य दिवसांच्या तुलनेत 45 ते 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. MakeMyTrip ने सांगितले की 15 फेब्रुवारीच्या विकेंडसाठी कोलंबो बुकिंगमध्ये अवघ्या तीन दिवसांत दुप्पट वाढ झाली आहे. तसेच Cleartrip च्या आकडेवारीनुसार, भारत-पाकिस्तान सामन्यामुळे कोलंबो बुकिंगमध्ये तब्बल 65 टक्क्यांनी वाढ नोंदवली गेली आहे. मुंबई, दिल्ली, बेंगळुरू आणि हैदराबादसारख्या मोठ्या शहरांतून सर्वाधिक बुकिंग होत असल्याचे समोर आले आहे.
कोलंबोतील हॉटेल व्यवसायालाही या सामन्याचा (T20 World Cup) मोठा फायदा होत आहे. शहरातील मध्यवर्ती भागातील चार आणि पाच ताऱ्यांच्या हॉटेल्समध्ये प्रचंड मागणी वाढली असून प्रीमियम हॉटेल्सचे दर इतर हंगामांच्या तुलनेत 20 ते 25 टक्क्यांनी वाढले आहेत. अनेक हॉटेल्स हाऊसफुल्लच्या उंबरठ्यावर पोहोचली असून सामन्याच्या पार्श्वभूमीवर कोलंबोमध्ये अक्षरशः क्रिकेटप्रेमींचा जनसागर उसळला आहे.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील ही लढत केवळ खेळापुरती मर्यादित नसून ती भावनांची, प्रतिष्ठेची आणि बाजारपेठेचीही मोठी स्पर्धा ठरत आहे. मैदानावरच्या खेळासोबतच जाहिरात, प्रवास आणि पर्यटन क्षेत्रातही या सामन्याची धग स्पष्टपणे जाणवत आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार