मुंबई, पुण्यासह महाराष्ट्र–गुजरातमधील अनेक शहरांमध्ये DMart हे नाव म्हणजे स्वस्त (shopping) दरात उत्तम दर्जाची खरेदी अशी ओळख बनले आहे. किराणा सामानापासून घरगुती वस्तू, कपडे, इलेक्ट्रॉनिक्सपर्यंत DMart नेहमीच ग्राहकांची पहिली पसंती राहिली आहे. मात्र आता DMart ने आपली DMart Ready ही ऑनलाइन सेवा अधिक वेगाने आणि प्रभावीपणे सुरू केली आहे. त्यामुळे ग्राहकांसमोर एक प्रश्न उभा राहतोय की ऑफलाइन DMart स्टोअरमधून खरेदी करणे परवडते की DMart Ready अॅप/वेबसाइटवरून?

DMart च्या ऑफलाइन स्टोअरमध्ये खरेदी (shopping) करताना अनेक ग्राहकांना आजही अधिक विश्वास वाटतो. कारण येथे समोरासमोर माल तपासता येतो, पॅकिंग, एक्स्पायरी डेट आणि दर्जा स्वतः पाहता येतो. मोठ्या प्रमाणात महिन्याची खरेदी करणाऱ्यांसाठी हे स्टोअर विशेष सोयीचे ठरते. कारण एकाच वेळी सगळा माल खरेदी करून ताबडतोब घरी नेता येतो.
काही शहरांमध्ये बिल 2000 रुपयांपेक्षा जास्त असल्यास मोफत होम डिलिव्हरीची सुविधाही DMart देते. याशिवाय नियमित ग्राहकांसाठी स्टोअरमध्येच ‘Buy More Save More’ स्क्रॅच कार्ड्स, विशेष ऑफर्स आणि सवलती मिळतात ज्यामुळे एकूण बिलावर चांगली बचत होते.
वेळेअभावी स्टोअरला जाणे शक्य (shopping) नसलेल्या ग्राहकांसाठी DMart Ready अॅप आणि वेबसाइट हा एक उत्तम पर्याय ठरत आहे. येथे किराणा, भाज्या-फळे, घरगुती वस्तू, कपडे ते काही प्रमाणात इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी बसल्या मागवता येतात. DMart Ready वर दररोज सकाळी 10 वाजता ‘Flash Sale’ असते, ज्यामध्ये निवडक वस्तूंवर 30 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट दिली जाते. पहिल्यांदा ऑर्डर देणाऱ्या ग्राहकांना 499 रुपयांपेक्षा जास्त खरेदीवर 150 रुपयांची सूट आणि 1 महिना मोफत डिलिव्हरीचा लाभ मिळतो.
याशिवाय Pick-up Point हा पर्यायही उपलब्ध आहे. यामध्ये ऑनलाइन ऑर्डर करून जवळच्या DMart मधून स्वतः माल उचलल्यास अतिरिक्त 3 ते 5 टक्के सूट मिळते. नियमित ग्राहकांसाठी सबस्क्रिप्शन प्लॅन देखील आहे. दरमहा सुमारे 99 रुपये भरून दुध, भाजीपाला यांसारख्या रोजच्या वस्तूंवर 10 ते 20 टक्के हमखास बचत करता येते.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी