कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी : देशाच्या वॉर रूममध्ये सुरू असलेले गोपनीय युद्ध डावपेच, सीमेवर सुरू असलेल्या हालचाली, लॉन्च पॅड वरील जवानांची लगबग, भूपृष्ठ दळणवळण, या गोष्टी अतिसंवेदनशील असतात. पण त्यावर आणि युद्धजन्य स्थितीत झालेले नुकसान या विषयावर जाहीर चर्चा होऊ नये किंवा केली जाऊ नये(topic). पण याचेही काही जणांना भान सुटत चाललय. भारत आणि पाक अघोषित युद्धात पाकिस्तानने भारताचे फार मोठे नुकसान केले आहे आणि ही बाब लपवली जात आहे. किंवा ऑपरेशन सिंदूरने नेमके भारताने काय साध्य केले? अशी शत्रू राष्ट्राला मदत करणारी भूमिका इंडिया आघाडीकडून तसेच तथाकथित नेत्यांकडून घेतली जात आहे. या अति संवेदनशील विषयावर खुली चर्चा व्हावी म्हणून संसदेचे विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणी होताना दिसते आहे.
सिंगापूर येथील एका न्यूज चॅनेलला विशेष मुलाखत देताना भारताचे सीडीएस श्री. अनिल चौहान यांनी सर्वांनाच संभ्रमात टाकणारे एक विधान केले होते. भारताचे विमान पडले ही फार गंभीर बाब नाही, पण आम्ही झालेल्या चुका सुधारून पाकिस्तान वर हल्ला केला. या त्यांच्या एका वाक्याचा इंडिया आघाडीतील काही नेते राजकीय भांडवल करताना दिसू लागले आहेत. एक ज्येष्ठ नेते सुब्रमण्य स्वामी यांनी तर पाकिस्तानने भारताची पाच लढाऊ विमाने पाडली असे वक्तव्य करून काय मिळवले हे कळावयास मार्ग नाही.
भारताची पाच लढाऊ विमाने आम्ही पाडली ही वस्तुस्थिती असती तर पाकिस्तानने त्याचे जागतिक स्तरावर मोठे भांडवल केले असते(topic). तथापि भारतीय लढाऊ विमाने पाडली याचा काडी इतका पुरावा उपलब्ध नाही किंवा पाकिस्तानने त्याचा पुराव्यासह दावा केलेला नाही. महाराष्ट्रातील सर्व विरोधी राजकीय पक्षांचे एकमेव प्रवक्ते संजय राऊत यांनी ऑपरेशन सिंदूर हे पूर्णपणे फसले आहे. असे विधान करून भारतीय लष्कराचा घोर अपमान केला आहे तर त्यांच्याच एक सहकारी असलेल्या सुषमा अंधारे यांनी युकेन युद्धातील काही दृश्ये भारतीय संरक्षण मंत्र्यांनी ती पाकिस्तानातील असल्याचे भासवले आहे असे सांगून भारतीय लष्कराची मानखंडना केली आहे.
पहलगाम येथे 26 पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या झाडून मारणारे ते दहशतवादी अद्याप का सापडलेले नाहीत? ते सापडलेले नाहीत याचा अर्थ ऑपरेशन सिंदूर कुचकामी ठरले आहे. असे राज ठाकरे हे म्हणतात. उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया ही भारतीय सैन्य दलाचे मनोबल वाढवणारी आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उपहास करणारी आहे हेच कळत नाही. इंडिया आघाडीचे प्रमुख राहुल गांधी यांनी तर भारत पाक अघोषित युद्धप्रकरणी भारतालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. या अघोषित युद्ध प्रकरणी नरेंद्र मोदी यांनी खुलेआम चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलवावे अशी मागणी शस्त्र संधी झाल्याच्या दुसऱ्या दिवशी केलेली आहे.
भारताने हे अघोषित युद्ध जिंकले आहे हे जगातील अनेक देशांनी मान्य केले आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान(topic) शहाबाज शरीफ यांनी भारताने पाकिस्तानचे खूप मोठे नुकसान केले असल्याचे कबूल केले आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेकांनी भारताच्या सैन्य दलाचे कौतुक केले आहे. पण इंडिया आघाडीतील अनेक नेत्यांनी शस्त्र संधी करण्यासाठी घाई का केली असा सवाल उपस्थित केला आहे. हा प्रश्न तेव्हा सर्वसामान्य जनतेलाही पडलेला होता.
कारण पहेलगाम दहशतकांड घडल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच अन्य काही नेत्यांनी”अशा प्रकारची दहशतवादी कृत्ये पुन्हा करताना पाकिस्तानला हजार वेळा विचार करावा लागेल इतका करारा जबाब दिला जाईल. अशा प्रकारची विधाने करून”आता भारत गप्प बसणार नाही, पाकिस्तानचे तुकडे करेल, किमान पीओके ताब्यात घेईल”असे वातावरण तयार करण्यात आले होते. अशा प्रकारची तयार केलेली प्रतिमा ही सत्ताधाऱ्यांच्या काहीशी अंगलट आली. हे नाकारता येत नाही पण तरीही ऑपरेशन सिंदूर बद्दल अप्रत्यक्षपणे संशय व्यक्त करणे, नरेंद्र मोदी हे देशवासीयांपासून काहीतरी लपवत आहेत असे वातावरण तयार करणे म्हणजे भारतीय सैन्य दलाच्या मनोबलावर प्रतिकूल परिणाम करण्यासारखे आहे.
हेही वाचा :