कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

‌महाराष्ट्रात आम्ही मराठी, देशात आम्ही हिंदू अशी सरळ (Marathi)आणि साधी हिंदुत्वाची भूमिका मांडणाऱ्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्याजन्मशताब्दी वर्षात मुंबई महापालिकेच्या महापौरपदी रितू राजेश तावडे आणि आणि उपमहापौरपदी संजय घाडी हे दोन मराठी चेहरे अविरोध निवडले गेले आहेत. बाळासाहेबांना अभिप्रेत असलेले हे दोन्ही चेहरे हिंदुत्ववादी आहेत. मुंबई महापालिकेच्या इतिहासात महापौर आणि उपमहापौर निवडीच्या वेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित असणे हे पहिल्यांदा घडले आहे. आणि मुंबई ही मराठी माणसाचीच आहे हे सुद्धा या निवडीने अधोरेखित झाले आहे.बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष सुरू झाले आहे. अशावेळी मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा महापौर विराजमान झाला पाहिजे असे मराठी माणसाला वाटणे स्वाभाविक होते. दोन्ही ठाकरे हे एकत्र येऊन महापालिका निवडणूक त्याच निर्धाराने लढले होते पण त्यांचे अंदाज चुकले. वातावरण निर्मिती त्यांना करता आली नाही. बेरजेच्या राजकारणाला यश आले नाही. काँग्रेस स्वतंत्र लढली. आणि म्हणूनच महायुती जिंकली.

महापौर शिवसेनेचा नाही झाला पण मराठी महिला महापौर बनली.(Marathi) रितू तावडे या भाजपच्या असल्या तरी त्या अस्सल मराठी चेहरा आहेत. मराठी मुद्द्याभोवती ही निवडणूक फिरली आणि मराठी माणूसच जिंकला. उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचा उमेदवार या निवडणुकीत दिला नाही. त्यांच्या या भूमिकेचे स्वागतच केले पाहिजे. अर्थात त्यांना शिवसेनेच्या संख्याबळाचे भान होते आणि म्हणूनच त्यांनी ही निवडणूक अविरोध होऊ दिली. राज्याची उपराजधानी असलेल्या नागपूर महापालिकेचे देवेंद्र फडणवीस हे दोन वेळा महापौर होते. मात्र 44 वर्षानंतर मुंबईचा महापौर हा भाजपाचा बनतो आहे म्हणून ते मुंबई महापालिकेच्या महापौर पदाच्या निवडीची प्रक्रिया पाहण्यासाठी खास उपस्थित होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व अन्य काही मंत्री मुंबई महापालिकेत एकाच वेळी उपस्थित राहण्याचे पालिकेच्या इतिहासातील पहिलेच उदाहरण आहे. मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या आधी काही दिवसांपासून मुंबई शहरात मराठीचा मुद्दा गाजत होता आणि तो खास करून उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी उचलून धरला होता.

या एकूण पार्श्वभूमीवर भाजप आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला (Marathi) मुंबई महापालिकेत बहुमत प्राप्त झाल्यानंतर त्यांना महापौर पदासाठी मराठी माणसाचा विचार करावा लागला हे महत्त्वाचे आहे. अमराठी चेहरा भाजपाने दिला असता तर, टीकेची झोड उठली असती.बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दीचे वर्ष सध्या चालू झाले आहे. या पार्श्वभूमीवर महायुतीने महापौर आणि उपमहापौर म्हणून मराठी चेहऱ्यालाप्राधान्य दिले आहे. बाळासाहेब ठाकरे यांना अभिप्रेत असलेला मुंबईचा विकास मुंबई महापालिकेच्या नव्या सभागृहाकडून केला जाईल. आणि महायुती सरकार त्यांना सहकार्य करेल असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या निवडीनंतर मीडियाशी बोलताना दिले आहे. मुंबई महापालिकेच्या सभागृहात महापौर आणि उपमहापौर निवडीची प्रक्रिया प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळाली त्याबद्दल फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला.महापौर आणि उपमहापौर निवडीसाठी नगर विकास मंत्रालयाकडून पीठासन अधिकारी म्हणून भूषण गगराणी यांची नियुक्ती केली होती आणि त्याला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी हरकत घेतली होती.

त्यामुळे थोडा वेळ सभागृहात गोंधळाचे वातावरण होते.(Marathi) वास्तविक किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या महापौर होत्या आणि त्यामुळे त्यांना सभागृहाचे नियम आणि पीठासन अधिकारी का नेमला जातो याची माहिती त्यांना असणे आवश्यक होते.सर्वसामान्य जनतेलालोकप्रतिनिधीची लोकशाही जवळची वाटते. गेली काही वर्षे मुंबई महापालिकेवर प्रशासक राज होते आणि बुधवारपासून तेथे लोकप्रतिनिधींचे सभागृह अस्तित्वात आले आहे. आता या सभागृहावर मुंबई शहराचे प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी आहे. सुदैवाने त्यांच्या मागे महायुतीचे सरकार आहे. हे शहर जागतिक दर्जाचे करण्याचे मोठे आव्हान नव्या सभागृहासमोर आहे. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई शहर समस्या ग्रस्त बनते. वाढलेल्या लोकसंख्येचा ताण पायाभूत सुविधांवर पडतो आहे. सुमारे दोन कोटी लोकसंख्या असलेल्या मुंबई शहरात तितक्या मजबूत पायाभूत सुविधा नाही आहेत हे वास्तव आहे.

महायुतीच्या सरकारकडून मुंबई शहर झोपडपट्टीमुक्त करण्याचे नियोजन आहे (Marathi)आणि त्याची धारावी झोपडपट्टी पासून सुरुवातही झाली आहे. या निवडणुकीत मुंबईकरांना आम्ही जी आश्वासने दिली आहेत ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील असे नूतन महापौर रितू तावडे यांनी निवडीनंतर केलेल्या भाषणात मुंबईकरांना आश्वस्त केले आहे. अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताबद्दल आमदार रोहित पवार यांनी काही शंका उपस्थित केलेल्या आहेत, त्याचा संदर्भ घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अपघात प्रकरणी जे काही सत्य आहे ते सर्वसामान्य जनतेच्या समोर आले पाहिजे याबद्दल दुमत नाही. पण भारतीय तपास यंत्रणाबद्दल शंका घेणे हे उचित नाही असेही त्यांनी म्हटले आहे. याच वेळी मुंबई महापालिकेला सर्व प्रकारचे सहकार्य महायुती सरकारचे राहील हे आश्वासनही त्यांनी दिले आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?