फक्त भारतीयांचच नव्हे, तर महाराष्ट्राचंही क्रिकेटप्रेम पाहता आता राज्याला आणखी (international) एक नवं आणि आधुनिक सुविधा असणारं क्रिकेट स्टेडियम मिळणार आहे. करवीर तालुक्यातील विकासवाडी इथं हे स्टेडियम तयार केलं जाणार असून, त्यासाठी राज्या शासनाच्या मंत्रिमंडळ बैठकी त यासंदर्भातील निर्णय घेत 12 हेक्टर 76 आर जमीनीसही मान्यता देण्यात आली. ज्यामुळं कोल्हापुरातील क्रीडाप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला.कोल्हापुरातील या स्टेडियमसाठी शासकीय जमीन विनामूल्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मंगळवार, 10 फेब्रुवारी 2026 रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मागील 30 वर्षांपासून कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमसाठी सातत्यानं पाठपुरावा करण्यात येत होता, जो आता यशस्वी मार्गावर जाताना दिसत आहे.

कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मागणीनुसार प्राथमिक(international) स्वरूपात क्रीडा विभागाने आंतरराष्ट्रीय मैदानाचा आराखडा प्रस्ताव शासनाला सादर केला होता. त्यावर राज्य सरकारने हा निर्णय घेतला. प्रस्तावित मैदान ICC च्या मानांकनानुसार विकसित करण्यात येणार असून त्यात विविध सुविधाही असतील.उपलब्ध माहितीनुसार कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनकडून झालेल्या या मागणीच्या धर्तीवर शासन स्तरावर माजी खासदार संभाजीराजे छत्रपती, खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक यांनी प्रयत्न केले. शासनाच्या या निर्णयाचं कोल्हापुरातील विरोधकांनीसुद्धा स्वागत केलं असून, त्यामुळं येतील क्रीडा सुविधांना आणखी बळ मिळेल असं म्हणत विधान परिषद गटनेते सतेज पाटील यांनीही निर्णयाचं स्वागत केलं.
कोल्हापुरात विकसित करण्यात येणाऱ्या मैदान परिसरात मुख्य (international)मैदानासह सराव मैदान, खेळाडूंसाठी अत्याधुनिक सुविधा देण्यात येतील. इथं प्रेक्षक गॅलरी, प्रशस्त पार्किंग, माध्यम सुविधासुद्धा उपलब्ध असतील. पाणी, वीज, ड्रेनेज व्यवस्था यासह जिम आणि रेस्टॉरंटचाही इथं समावेश असणार आहे. पर्यावरणाचे सर्व मानक पाळून हे मैदान तयार करण्यात येणार आहे. उपलब्ध माहितीनुसार या मैदानात वीस ते पस्तीस हजार प्रेक्षक बसण्याची व्यवस्था असणार आहे.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी