कोल्हापूर/ विशेष प्रतिनिधी

अजितदादा पवार यांच्या जीविताला धोका होता असे काही संकेत (plane)त्यांच्याकडूनच मिळाले होते. त्याचा आत्ता विचार केल्यानंतर दिनांक 28 जानेवारी रोजी भल्या सकाळी बारामती विमानतळाच्या परिसरात झालेल्या विमान अपघाताबद्दल माझ्या मनात काही शंका उपस्थित होतात.आणि या शंकांचे निरसन होत नाही तोपर्यंत मी शांत झोपणार नाही. असे असे आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितले. त्यामुळे या अपघाताबद्दल पुन्हा उलट सुलट चर्चेला सुरुवात होणार आहे.रोहित पवार यांनी मंगळवारीकाही कागदपत्रे आणि शासकीय चौकशीतील विसंगती समोर आणून हा विमान अपघात नसूनघातपात असू शकतो. भारताबाहेरील विमानतज्ज्ञांचा या अपघात विषयक चौकशी समितीत सहभाग असावा असे त्यांनी म्हटले आहे. या विमान अपघात विषयक त्यांनी जी माहिती कागदपत्रांसह समोर आणली आहे आणि जे मुद्दे उपस्थित केले आहेत त्याचा गांभीर्याने विचार होणे गरजेचे आहे.

ज्या दिवशी विमान अपघात झाला त्याच दिवशी शरद पवार यांनी (plane)हा अपघात आहे त्यात कुणी राजकारण करू नये असे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर त्यांनी या अपघात विषयक व्यक्त केलेल्या शंका अगदीच टाळता येतील अशा नाहीत.
शरद पवार यांचे हे आवाहन तात्कालिक परिस्थितीवर अवलंबून होते. मी या अपघाताचा बरेच दिवस अभ्यास करून त्यावर माझे मत व्यक्त केले आहे असा खुलासा त्यांनी केला आहे.अजित दादा पवार हे गेल्या काही काळापासून प्लास्टिकच्या बाटलीतील पाणी पीत नसत. प्लास्टिक ऐवजी काचेच्या बाटलीतील पाणी ते पीत असत. या बदलाकडे लक्ष वेधत असताना अजितदादा पवार यांना पाण्यातून विषबाधा होण्याची शंका होती. तसेच ते गेल्या काही महिन्यांपासून स्वतःचे विमान असावे असा विचार बोलून दाखवत असत. याचा अर्थ त्यांना विमान अपघात होण्याची भीती वाटत असावी. आणि म्हणूनच ते स्वतःचे विमान असावे या विचारावर आले होते असे रोहित पवार यांचे म्हणणे आहे.

पिण्याच्या बाटलीत वीष मिसळून, आपला गेम वाजवला जाईल. (plane)आपण प्रवास करत असलेल्या विमानाचा अपघात घडवून आणला जाईल अशी भीती अजितदादा पवार यांना होती हे सांगण्याचा प्रयत्न रोहित पवार यांनी केला आहे.दिनांक 27 जानेवारी रोजी अजित दादा हे शासकीय वाहनातून बारामती ला येणार होते.विमान प्रवास हा त्यांना अभिप्रेत नव्हता. त्याच दिवशी पूर्व विदर्भातील एका नेत्याच्या फाईलवर सही करायची होती. म्हणून ते थांबले होते. त्याला थोडा उशीर झाला. मग त्यांनी आधीच एक दिवस बाय कार बारामतीला येण्याचा निर्णय रद्द केला आणि दिनांक 28 जानेवारी रोजी व्ही एस आर कंपनीच्या खाजगी विमानातून बारामतीला जाण्याचा निर्णय घेतला.ते फाईल प्रकरण नसते तर दादा आधीच एक दिवस पुण्याला पोहोचले असते.असे रोहित पवार म्हणतात.म्हणजे अजित दादा पवार यांचा बारामती कडचा प्रवास दिनांक 28 जानेवारी रोजी विमानानेच व्हावा असे कोणालातरी वाटत होते असे त्यांना सुचवायचे आहे. म्हणजे हा एक प्रकारचा कट होता अशी शंका त्यांना येते.
व्ही एस आर या विमान कंपनी विषयी तक्रारी होत्या.

दिनांक 28 जानेवारी रोजी,विमानाचा पायलेट बदलण्यात आला. (plane)त्याचे कारण काय? पायलट सुमित कपूर यांचे रेकॉर्ड चांगले नव्हते. त्याची मानसिक स्थिती चांगली नसावी किंवा तो डिप्रेशन मध्ये होता असा संशय घ्यायला जागा आहे.कारण तो अपघात होण्यापूर्वी काहीही बोलत नाही. याचा अर्थ तो नशेत असावा किंवा झोपेत असावा अशी शंका रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी या विमान अपघात विषयी ग्राफिक पद्धतीने पत्रकारांना माहिती दिली. अनेक शंका आणि कुशंका व्यक्त करणाऱ्या रोहित पवार यांना या विमान अपघात विषयक संशय आहे. तो घातपात असू शकतो. म्हणूनच या विमाना अपघाताची चौकशी करण्यासाठी भारताबाहेरील विमानतज्ञांना आचार्य करण्यात यावे अशी त्यांनी मागणी केली आहे. राज्य शासनाने केलेल्या चौकशीत काही विसंगती आहेत असा दावाही त्यांनी केला आहे.एकूणच त्यांनी या अपघाताचा चांगला अभ्यास केला आहे. काही रास्त शंका उपस्थित केलेल्या आहेत. अजितदादा पवार हे राज्यातील शक्तिमान नेते होते. आणि त्यांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे

आणि म्हणूनच त्याची तज्ञांच्या मार्फत चौकशी झाली पाहिजे ही (plane)त्यांनी केलेली मागणी योग्यच म्हणावी लागेल.
सुनेत्रा पवार यांना राज्याच्या उपमुख्यमंत्री म्हणून तातडीने शपथ घ्यायची नव्हती. पण त्यांच्या पक्षातील काही नेत्यांना शपथविधीची घाई झाली होती अशी टिकाहि त्यांनी केली. महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला तातडीचा शपथविधी आवडलेला नाही असेच त्यांना सुचित करावयाचे आहे. अजित दादा पवार यांच्या विमान अपघाताविषयी यापूर्वीही काही जणांनी शंका व्यक्त केलेली आहे आणि आता त्यांचे पुतणे आमदार रोहित पवार यांनी हा अपघातामध्ये घात असू शकतो अशी शक्यता बोलून दाखवली आहे. एकूणच या प्रकरणाची सखोल चौकशी होऊन अपघाताची नेमकी कारणे राज्य शासनाने सर्वसामान्य जनतेसमोर ठेवली पाहिजेत.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी