कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे “अर्बन फेस”असूनही त्यांच्याच नेतृत्वाखाली (flag)झालेल्या राज्यातील मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्याजिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने जोरदार मुसंडी मारली आहे. राज्याच्या ग्रामीण भागात इतके मोठे यश भाजपने प्रथमच मिळवले आहे. सर्वाधिक जिल्हा परिषद भारतीय जनता पक्षाच्या हाती आल्या आहेत. महाविकास आघाडीला एकाही जिल्हा परिषदेमध्ये ताक काबीज करता आलेली नाही. भाजपला आणि महायुतीला
अजित दादा पवार यांच्या अपघाती निधनानंतर सहानभूतीसुद्धा मिळालेली दिसते. कोल्हापूर जिल्हा परिषदही महायुतीने जिंकली आहे.जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांची राज्याच्या ग्रामीण भागात धामधूम सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा अजित दादा पवार यांचे बारामती विमानतळा जवळच झालेल्या विमान अपघातात निधन झाले होते.

त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसलाया निवडणुकीत सहानुभूती मिळालेली आहे(flag), हे निकालाच्या एकूण आकडेवारीवरून स्पष्ट होते आहे. अर्थात या सहानुभूतीचा भारतीय जनता पक्ष आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सुद्धा फायदा मिळालेला आहे हे नाकारता येणार नाही.इसवी सन 2017 च्या जिल्हा परिषदेच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाचे एकूण 141 जिल्हा परिषद सदस्य होते. आता हीच संख्या 236 वर पोहोचली आहे. 2017 मध्ये राज्यातील पंचायत समितीच्या सभागृहात भारतीय जनता पक्षाच्या 284 जागा होत्या आता ही संख्या 410 वर पोहोचली आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाने राज्यातील शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागही आपल्याकडे खेचून घेतलेला दिसतो. अर्थात हे यश भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश अध्यक्षांचे नसून ते विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आहे असे मी संदिग्धपणे म्हणावे लागेल. विशेष म्हणजे महापालिका निवडणुका वेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील अनेक महानगरांमध्ये सभा घेतल्या होत्या मात्र जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या दरम्यान तेप्रचारात फारसे कुठे दिसले नाहीत पण तरीही त्यांनी अभूतपूर्व यश आपल्याकडे खेचून घेतलेले आहे यामध्ये दुमत नाही.
राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समिती साठी दिनांक (flag)सात फेब्रुवारी रोजी मतदान झाले आणि त्याचे निकाल सोमवारी जाहीर झाले. बारा जिल्हा परिषदांपैकी आठ जिल्हा परिषदा भाजपकडे दोन जिल्हा परिषदा एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि दोन जिल्हा परिषद राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडेगेले आहेत. 125 पंचायत समितीच्या 1462 जागा आहेत त्यापैकी भारतीय जनता पक्षाने 410, राष्ट्रवादी काँग्रेस अजित दादा गटाने ३०६ आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने 270 जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीला मात्र दारुण पराभव स्वीकारावा लागला आहे. एकूणच राज्यातील ग्रामीण भागातील जनतेने भाजप तथा महायुतीवर विश्वास दाखवला असल्याचे चित्र आहे. राज्यातील बहुतांशी महापालिका महायुतीने जिंकल्या आणि आता सर्वात जास्त सर्व म्हणजे बाबा जिल्हा परिषदा महायुतीने ताब्यात घेतलेल्या आहेत.
महाविकास आघाडीचे नेते विशेषतः ठाकरे गटाचे नेते यांनी महायुतीवर (flag)टीका करण्यात धन्यता मानली. निवडणूक यंत्रणा आणि एकूण प्रक्रिया याकडे नकारात्मक दृष्टीने पाहिले. परिणामी सर्वसामान्य जनतेने त्यांच्याकडे गांभीर्याने पाहिले नाही किंबहुना त्यांच्याकडे पाठ फिरवली.विधानसभा, पाठव पाठव स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीची सरशी का झाली आणि आपणाला लोकांनी का नाकारले याचे आत्मचिंतन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केले पाहिजे. आत्ताही अजितदादा पवार यांच्या निधनामुळे महायुतीला सहानभूती मिळाली असा युक्तीवाद त्यांच्याकडून केला जाईल. कोल्हापूरची जिल्हा परिषद ही हसनमुश्रीफ यांच्या अर्थात महायुतीच्या ताब्यात गेली आहे.
अजित दादा पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने 20 जागा जिंकलेल्या आहेत. (flag)भाजप 12, एकनाथ शिंदे यांची शिवसेना नऊ, याशिवाय जनसुराज्य पक्षाचे सहाअशा जागा मिळाल्यामुळे महायुतीला कोल्हापूर जिल्हा परिषदेत एक हाती सत्ता मिळाली आहे अर्थात कोल्हापूर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादी काँग्रेसचाच अध्यक्षहोणार आहे यात संदेह नाही.या निवडणुकीतही जनसुराज्य शक्ती पक्षाचे आमदार माने तसेच पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास आबाजी mयांना मतदारांनी धक्का दिला आहे. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतही काँग्रेसचे सतेज पाटील यांनी एकाकी झुंज दिली. काँग्रेसच्या 15 आणि इतर पाच असे त्यांच्याकडे 20 संख्या बळ आहे. जिल्हा परिषदेच्या विसर्जित सभागृहात अविभाजित राष्ट्रवादी काँग्रेसचे 15 सदस्य होते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित दादा गटाला वीस जागा मिळाल्यामुळे कोल्हापुरातहीत्यांना सहानुभूती मिळालेली दिसते.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी