महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने प्रवाशांसाठी मोठा (passengers)डिजिटल बदल जाहीर केला असून आता एसटी बस प्रवासातील विविध सामाजिक सवलतींचा लाभ घेण्यासाठी नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. परिवहन मंत्री तसेच एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या निर्णयामुळे सवलतींचे वितरण अधिक पारदर्शक आणि अचूक होणार असून रोख व्यवहारांवर पूर्णविराम देण्याच्या दिशेने महामंडळाने ठोस पाऊल उचलले आहे.

डिजिटल व्यवहारांना प्रोत्साहन देत एसटी महामंडळाने ही (passengers)प्रणाली राज्यभर लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रवाशांच्या सवलतींची अचूक नोंद ठेवणे, सुट्ट्या पैशांचा त्रास टाळणे आणि प्रवास अधिक सुलभ करणे हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे. हा केवळ तांत्रिक बदल नसून प्रवाशांच्या विश्वासाला डिजिटल आधार देणारी नवी सुरुवात असल्याचे प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट केले. या प्रकल्पासाठी ईबिक्स टेक्नोलॉजिस लिमिटेड आणि NSDL पेमेंट्स बँक यांच्याशी करार करण्यात आला असून राज्यभर लवकरच नोंदणी मोहीम सुरू होणार आहे. बसस्थानकांवरच कार्ड नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

ही योजना समाजातील विविध घटकांसाठी तयार करण्यात आली आहे. शालेय व तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना ‘सरल’ क्रमांकाशी लिंक केलेले कार्ड दिले जाईल. अमृत ज्येष्ठ नागरिक योजना आणि महिला सन्मान योजनेअंतर्गत प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना आधारशी संलग्न कार्ड दिले जाणार आहे. दिव्यांग प्रवाशांसाठी UDID क्रमांकाशी जोडलेले विशेष कार्ड उपलब्ध करून दिले जाईल. स्वातंत्र्यसैनिक, अधिस्वीकृतीधारक पत्रकार आणि राज्यस्तरीय पुरस्कार विजेते यांना विभागीय कार्यालयांमार्फत कार्ड प्रदान केले जाणार आहे.

नवीन NCMC कार्डची किंमत १९९ रुपये असून त्यात जीएसटीचा (passengers)समावेश आहे. ज्यांच्याकडे जुने स्मार्ट कार्ड आहे त्यांनी ते जमा केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड मिळू शकते. कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक ठेवणे आवश्यक राहील आणि ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येईल. रिचार्ज सुविधा कंडक्टरच्या ईटीआयएम मशीनवर, अधिकृत वेबसाइट किंवा मोबाइल ॲपवर तसेच नियुक्त एजंटांकडून उपलब्ध असेल.एसटीच्या लालपरी प्रवासाला पूर्णपणे कॅशलेस आणि डिजिटल बनवण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे. या स्मार्ट कार्डमुळे प्रवास अधिक सुरळीत, सुरक्षित आणि पारदर्शक होणार असून सवलतींचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी NCMC कार्ड अत्यावश्यक ठरणार आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?