नेवासा तालुक्यातील सौंदाळा गावाने सामाजिक (Saundala) समतेच्या दिशेने एक ऐतिहासिक आणि धाडसी पाऊल उचलत ‘जातमुक्त गाव’ होण्याचा ठराव एकमुखी मंजूर केला आहे. प्रगत आणि समाजहिताचे निर्णय घेणारे गाव म्हणून आधीपासून ओळख असलेल्या सौंदाळाने यापूर्वी शिवीगाळ बंदी, विधवा पुनर्विवाहास प्रोत्साहन, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध योजना आणि सर्वांगीण विकासासाठी अनेक महत्त्वाचे ठराव मंजूर केले होते. आता त्यात ‘जातमुक्त गाव’ या निर्णयाची भर पडली आहे.
ग्रामसभेत सरपंच शरद आरगडे यांनी जात हद्दपार करण्याचा ठराव मांडला. उपस्थित ग्रामस्थांनी कोणताही विरोध न करता या प्रस्तावाला संपूर्ण पाठिंबा दिला. या ठरावानुसार गावात यापुढे जात, पंथ, धर्म किंवा वंशाच्या आधारावर कोणताही भेदभाव केला जाणार नाही. सर्व नागरिक समान असून ‘माझी जात – मानव’ ही भावना गावाने स्वीकारली आहे.

आंतरजातीय विवाहांना पूर्ण मान्यता देत (Saundala) त्यांना प्रोत्साहन देण्याचाही निर्णय ग्रामसभेत घेण्यात आला. सामाजिक एकात्मता आणि बंधुभाव अधिक दृढ करण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. गावातील सार्वजनिक ठिकाणे, ग्रामपंचायत कार्यालय, शासकीय योजना, सामाजिक व धार्मिक कार्यक्रम, विवाह समारंभ तसेच सण-उत्सवांमध्ये कोणत्याही प्रकारचा जातिभेद केला जाणार नाही, असे ठरावात स्पष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक नागरिकाला समान हक्क, समान वागणूक आणि समान संधी देण्याचा निर्धार ग्रामसभेने व्यक्त केला आहे.

डिजिटल युगातील बदल लक्षात घेऊन (Saundala) सोशल मीडियावर जातीय द्वेष पसरवणाऱ्या संदेशांवरही कठोर भूमिका घेण्यात आली आहे. कोणीही नागरिक जातिभेद करणारे किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश प्रसारित केल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी तरतूद ठरावात करण्यात आली आहे. प्रत्यक्ष व्यवहारासोबतच ऑनलाईन माध्यमांतही समतेचा विचार रुजवण्याचा प्रयत्न या निर्णयातून दिसून येतो.
या उपक्रमामुळे सौंदाळा गाव राज्यातच नव्हे तर देशभरात सामाजिक एकतेचा आदर्श ठरण्याची चिन्हे आहेत. ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि सकारात्मक भूमिकेमुळे ‘जातमुक्त गाव’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्याचा निर्धार सौंदाळाने केला आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी