सिनेसृष्टीत अनेकदा असे घडते की, थिएटरमध्ये अपेक्षित यश न मिळालेला चित्रपट (theaters) ओटीटीवर मात्र प्रेक्षकांचा भरघोस प्रतिसाद मिळवतो. तमिळ चित्रपट ‘परशक्ती’बाबतही सध्या असाच अनुभव समोर येताना दिसत आहे. 10 जानेवारी 2026 रोजी प्रदर्शित झालेल्या या पॉलिटिकल अ‍ॅक्शन ड्रामा चित्रपटाला थिएटरमध्ये निराशाजनक प्रतिसाद मिळाला होता, पण ओटीटीवर रिलीज होताच चित्रपटाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

2 तास 39 मिनिटांचा ‘परशक्ती’ हा चित्रपट तीन (theaters) भावांच्या आयुष्याभोवती फिरणारा गंभीर सामाजिक कथानक मांडतो. गुणसेकरन, कन्नन आणि थंगावेलु या तिघांची कथा दुसऱ्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर उलगडते. युद्धामुळे तिन्ही भाऊ वेगवेगळ्या दिशांना विखुरले जातात. युद्ध संपल्यानंतर मायदेशी परतलेला मोठा भाऊ समाजातील गरीबी, अंधश्रद्धा, धार्मिक पाखंड आणि अन्यायाशी दोन हात करताना दिसतो. कथानकात जातीय भेदभाव, महिलांवरील अत्याचार आणि सामाजिक शोषण यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करण्यात आले आहे.

सुधा कोंगारा यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेल्या या चित्रपटात (theaters) शिवाकार्तिकेय, रवि मोहन आणि श्रीलीला यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. विषय गंभीर असला तरी कथानकाची मांडणी आणि गती अनेक प्रेक्षकांना प्रभावी वाटली नाही. त्यामुळे चित्रपटाला थिएटरमध्ये ‘कंटाळवाणा’ आणि ‘प्रभावहीन’ अशा प्रतिक्रिया मिळाल्या आणि बॉक्स ऑफिसवर अपेक्षित कमाई करण्यात तो अपयशी ठरला.
माहितीनुसार, चित्रपटाचे बजेट सुमारे 150 ते 200 कोटी रुपये होते, तर थिएटरमधील एकूण कमाई केवळ 84 ते 85 कोटी रुपयांपर्यंतच मर्यादित राहिली. परिणामी निर्मात्यांना जवळपास 95 कोटी रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागले. वर्षाच्या सुरुवातीलाच झालेल्या या अपयशामुळे चित्रपटसृष्टीतही मोठी चर्चा रंगली होती.

मात्र थिएटरमध्ये (theaters) अपयशी ठरलेला ‘परशक्ती’ ओटीटीवर रिलीज झाल्यानंतर चित्र पूर्णपणे बदललेले दिसत आहे. 7 फेब्रुवारी 2026 रोजी ZEE5 वर प्रदर्शित झाल्यानंतर अवघ्या 48 तासांतच हा चित्रपट नंबर 1 ट्रेंडिंग ठरला. सोशल मीडियावर प्रेक्षकांकडून सकारात्मक प्रतिक्रिया मिळत असून चित्रपट पुन्हा चर्चेत आला आहे. थिएटरमध्ये न चाललेला हा चित्रपट आता ओटीटीवर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरल्याने निर्मात्यांसाठी हा दिलासादायक क्षण मानला जात आहे.

हेही वाचा :

आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा

अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना

‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी