गुहागर जिल्ह्यातील आंबा कलमांना पहिल्या टप्प्यात ७० टक्के, (bloomed) तर दुसऱ्या टण्यात २० टक्के मोहोर आला. परंतु, हा सर्व मोहोर अति थंडी, ढगाळ वातावरण, प्रचंड धुके यामुळे अक्षरशः करपला आहे. त्यामुळे १९० टक्के मोहोर आला असला तरी दहा टक्के देखील फळधारणा न झाल्यामुळे लाखो रुपये खते, कीटकनाशके, बुरशीनाशकांवर खर्च केलेले आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडण्याची शक्यता आहे.आता बागायतदारांना तिसऱ्या टप्प्यातील मोहोरातून मिळणाऱ्या उत्पादनावर अवलंबून राहावे लागणार आहे. कोकणातील फळपिकांना गेल्या काही वर्षापासून मोठा फटका बसत आहे. आंबा पीक तर गेली काही वर्षे सतत बदलत्या वातावरणाच्या चक्रव्यूहात अडकल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात यावर्षी पाऊस लांबला, त्यामुळे आंबा हंगाम लांबणार, असा सुरुवातीचा अंदाज होता. परंतु, १५ नोव्हेंबरनंतर थंडीची चाहुल सुरू झाली.

नोव्हेंबर अखेरपर्यंत थंडीचा कडाका खूपच वाढला. ही थंडी सुरुवातीला (bloomed)सर्वांनाच हवीहवीशी वाटू लागली, थंडीचे सकारात्मक परिणाम देखील आंबा बागांमध्ये दिसू लागले. नोव्हेंबर ते डिसेंबर अखेरपर्यंत जिल्ह्यातील ७० टक्के आंबा कलमांना मोहोर आला. त्यानतंरच्या दहा-पंधरा दिवसांत उर्वरित २० टक्के झाडे देखील मोहोराने बहरली.

मोहोराने बहरलेल्या आंबा बागा आता काळवंडल्या आहेत. मोहोर अक्षरश(bloomed) करपला आहे. ९० टक्के मोहोरलेल्या आंब्याला दहा टक्के देखील फळधारणा झालेली नाही. त्यामुळे बागायतदाराची चिंता वाढली आहे. आतापर्यंत लाखो रुपये खर्चुन खते, कीटकनाशक, बुरशीनाशकांच्या फवारण्या झाडांवर केल्या आहेत. याशिवाय कित्येक मजूर बागांमध्ये कामाला आहेत. दहा टक्के आंबा उत्पादनात उत्पादन खर्च देखील भागण्याची शक्यता कमी आहे. तिसऱ्या टप्प्यात मोहोर फुटण्याची प्रकिया सुरू झाली, परंतु त्यावर देखील फुलकिडीचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्यामुळे आधा कगायतदार सर्व बाजूनी अडचणीत आला असून, याच मोहोरावर आता उत्पादनाची अपेक्षा देखील आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी