राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनावर (death) बऱ्याच शंका व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवार यांच्या पक्षातूनही या शंका व्यक्त केल्या जात असून आता अजितदादांच्या कुटुंबीयांकडूनही या शंका व्यक्त गेल्या आहेत. अजित पवार यांचे पुतणे आणि शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनीही या अपघातावर शंका व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी काल पत्रकार परिषद घेऊन अजितदादांचा घातपात झाल्याची शंका व्यक्त केली. आजही रोहित पवार यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेऊन हीच शंका बोलून दाखवली आहे. तसेच अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ आणि जय पवार यांच्या मनातही तेच असल्याचं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.रोहित पवार यांनी आज दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सादरीकरण करत अजित पवार यांच्या अपघातावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले. पार्थला मी भेटलो. त्याच्या मनातही अनेक प्रश्न आहेत. त्यामुळेच अमोल मिटकरी, रुपाली पाटील वगैरे राष्ट्रवादीचे नेते मुख्यमंत्र्यांना भेटले. पार्थ आणि सुनेत्रा पवार यांच्या सांगण्यावरूनच ते भेटले असावे.

पार्थ आणि जयच्या मनात अपघाताविषयी शंका आहे.(death) शंका नसती तर त्यांच्या पक्षाचे लोक मुख्यमंत्र्यांना भेटले नसते. अपघात का झाला? कसा झाला? याची माहिती आम्हाला हवी आहे. त्यासाठी आम्ही हे करत आहोत, असं रोहित पवार म्हणाले.सुप्रिया सुळे यांनी आज अमित शाह यांची भेटीची वेळ मागितली आहे. माझ्या वतीने त्यांनी ही वेळ मागितली आहे. आमचा कोणत्याही पक्ष किंवा सरकारवर आरोप नाही. पण या घटनेची चौकशी झाली पाहिजे. अमित शाह यांना भेटून आम्ही त्यांना तशी मागणी करणार आहोत. यात घातपात आहे, असं आमचं म्हणणं आहे, असंही रोहित पवार यांनी म्हटलंय.थायलंडमध्ये एका पायलटने जाणूनबूजून विमान पाडलं होतं. का पाडलं होतं? त्याची चौकशी झाली. त्या अपघाताची माहिती समोर आली. ही माहिती कशी बाहेर आली? त्या चौकशी एजन्सी कोणत्या होत्या? हे पाहून, त्याची माहिती घेऊन त्या दिशेनेही तपास केला पाहिजे, असंही रोहित पवार म्हणाले.
यावेळी रोहित पवार यांनी काही प्रश्न उपस्थित केले.(death) मेन पायलट कपूरची चौकशी झाली पाहिजे. ते दारू का पित होते? त्यांना मेंटल ट्रेस होता का? फायनान्शियल कारण होतं का? पैशासाठी त्यांच्यावर दबाव होता का? त्यामुळे त्यांनी अपघात केला का? याची चौकशी झाली पाहिजे. कंपनीच्या व्हॉटसअप ग्रुपची चौकशी झाली पाहिजे. चॅट डीलिट झाल्या तरी ती माहिती मिळते. अॅरो नावाच्या कंपनीच्या चॅटचीही चौकशी केली पाहिजे. हँडलरने ओके का म्हटलं? व्हिजीबिलीटी नसताना टेक ऑफ का झालं आणि लँड का झालं याचीही चौकशी झाली पाहिजे. आम्हाला कोर्टात जायचं नाही. केंद्र आणि राज्य सरकारच्या एजन्सी चांगली चौकशी करतील. बाहेरच्या एजन्सीलाही चौकशीत घ्यावं, अशी मागणी त्यांनी केली.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी