कोल्हापूर/विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर महापालिकेच्यासार्वत्रिक निवडणुकीची सध्या रणधुमाळी सुरू आहे.(opportunity)प्रत्येक उमेदवार प्रभागाच्या विकासासाठी निवडणुकीच्या आखाड्यात उतरला आहे. महाविकास आघाडी , महायुती मधील घटक पक्षांनीस्वतंत्र किंवा एकत्रित जाहीरनामा अद्याप प्रसिद्ध केलेला नाही. मात्र सर्वच राजकीय पक्षांना कोल्हापूर शहराचा बोन्साय कुणी केलायाचा जाब जागरूक मतदारांनी विचारला पाहिजे आणि तशी संधी निवडणुकीच्या निमित्ताने उपलब्ध झाली आहे.महाराष्ट्रातील इतर महापालिकांच्या हद्दीमध्ये अनेकदा वाढ झाली आहे.काही शहरांची तर अनेकदा हद्द वाढ झाली आहे. मात्र कोल्हापूर त्याला पूर्णपणे अपवाद आहे. गेल्या 40 वर्षांपासून कोल्हापूर शहराच्या हद्द वाढीची मागणी सर्वसामान्य जनतेकडून होत असूनही काही लोकप्रतिनिधींनी ही मागणी दुर्लक्षितच केली आहे असे नव्हे तर मागणीला वाटाण्याच्या अक्षता लावलेल्या आहेत.

अगदी सुरुवातीला शहराच्या हद्दीपासून दहा किलोमीटरच्या आतील सुमारे 42 गावे शहराच्या (opportunity)हद्दीत समाविष्ट करण्यात यावीतअशी मागणी केली जात होती. नंतर गावांची संख्या 22 वर आली. पण ही सुद्धा मागणी बेदखल केली गेली आहे.
कोणत्याही शहराचा विकास हा हद्दवाढ केल्याशिवाय होत नाही असे राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी कोल्हापुरात अनेकदा सांगितले आहे.काँग्रेसचे पी. एन. पाटील, जिल्हा काँग्रेसचे विद्यमान अध्यक्ष सतेज पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्विजय खानविलकर, शेतकरी कामगार पक्षाचे संपतराव पवार पाटील, शिवसेनेचे चंद्रदीप नरके, डॉक्टर सुजित मिंणचेकर
या लोकप्रतिनिधींनी शहराच्या हद्द वाढीला सातत्याने विरोध केला आहे.
विशेष म्हणजे विरोध करणारे बहुतांशी नेते हे कोल्हापूर शहरातच राहतात. सतेज पाटील आणि हसन मुश्रीफ यांनी तर कोल्हापूर महापालिकेचे नेतृत्व केले आहे, सत्ताकारण केले आहे. शहराची हद्द वाढ झाली तर आपल्या विधानसभा मतदारसंघाचा भूगोल बिघडतो म्हणून या मंडळींचा हद्द वाढीला विरोध आहे.इसवी सन 1972 मध्ये कोल्हापूर महापालिका अस्तित्वात आली. तथापि जे नगरपालिकेचे क्षेत्र होते तेच क्षेत्र आजही आहे. एका इंचानेही त्यामध्ये वाढ झालेली नाही. इतर महानगरांच्या तुलनेत कोल्हापूर हे”महा खेडे “आहे.एखाद्या झाडाचे बोन्साय मध्ये रूपांतर करून ते कुंडीत ठेवले जाते. कोल्हापूरची अवस्था बोन्सायसारखीच झाली आहे.

गेल्या काही दिवसांपासून”कोल्हापूर हवं कसं, तुम्हाला पाहिजेल तसं”यावरून चर्चा सुरू झाली (opportunity)आहे. या चर्चेत कोल्हापूरच्या लोकांना हद्द वाढ ही अभिप्रेत आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांनी आठ गावे हद्द वाढीथ आणण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती. आता महापालिकेची निवडणुक प्रक्रिया सुरू झाल्यामुळे हद्द वाढ विषयच मागे पडला आहे.पुणे महापालिकेची हद्द वाढ होत असताना तेथेही विरोध झाला होता पण तरीही हद्द वाढ झाली. कारण पुण्याचे नेतृत्व करणारे अजितदादा पवार यांना
विरोध करण्याची हिम्मत कुणाला झाली नाही.कोल्हापूर शहराचे नेतृत्व महापालिकेच्या माध्यमातून करणाऱ्यांचाच शहर हद्द वाढीला विरोध आहे. हद्द वाढीत येणाऱ्या आठ गावांचा सुद्धा विषय मागे पडावा म्हणून 42 गावांच्या विकासासाठी प्राधिकरणाचा विषय भाजपच्याच मंडळींनी पुढे आणला आहे.राजकारणाशी संबंध नसलेल्या आणि कोल्हापूर शहरात राहणाऱ्या विविध क्षेत्रातील मंडळींनी एकत्र येऊन शहराच्या विकासासाठी एक स्वतंत्र जाहीरनामा प्रसिद्ध करावा आणि त्यामध्ये कोल्हापूर शहराची हद्द वाढ हा प्रमुख मुद्दा असावा.
हेही वाचा :
Sangli : भाजप वाढवण्यासाठी प्रामाणिकपणे काम करूनही डावलले जात असल्याचा मुद्दा
खबरदार! दुचाकीवर ट्रिपल सीट प्रवास करणाऱ्यांची खैर नाही, भरवा लागेल इतक्या रुपयांचा दंड
जेवताना रिल्स बघणं पडेल महागात, आत्ताच सोडा ही सवय