महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा शाब्दिक चकमक रंगण्याची चिन्हे दिसत (politics) आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गणेश नाईक यांच्यातील तणाव आता उघडपणे समोर आला आहे. नवी मुंबईतील भूखंडांच्या मुद्द्यावरून गणेश नाईक यांनी थेट उपमुख्यमंत्री शिंदेंना इशारा दिल्याने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी हॉस्पिटल, गार्डन आणि इतर (politics) सार्वजनिक प्रकल्पांसाठी भूखंडांची मागणी केली होती, मात्र ती पूर्ण होत नसल्याचा आरोप नाईक यांनी केला. जनतेच्या कामासाठी मागितलेले भूखंड मिळत नसतील तर मंत्रिपदाचा उपयोग काय, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला. मंत्रिपद गप्प बसण्यासाठी स्वीकारलेले नाही, असे स्पष्ट करत त्यांनी आपली भूमिका अधिक ठाम केली.
नाईक यांनी पुढे गंभीर आरोप करत काही दलालांमार्फत नवी मुंबईतील भूखंड बिल्डरांच्या घशात घातले जात असल्याचा दावा केला. ज्या मंत्रिमंडळाचा मी भाग आहे, त्याच मंत्रिमंडळातील नगरविकास खात्यातून असे प्रकार होत असतील तर ती लाजिरवाणी बाब असल्याचे ते म्हणाले. माझा राग शांत करायचा असेल तर सर्व भूखंड परत करावेत, असा इशाराही त्यांनी दिला.

या वक्तव्यामुळे राज्यातील सत्ताधारी गटात (politics) अस्वस्थता वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. नवी मुंबईतील भूखंडांचा प्रश्न आता केवळ स्थानिक पातळीवर न राहता राज्याच्या राजकारणात मोठा मुद्दा ठरू शकतो. येत्या काळात या वादावर उपमुख्यमंत्री शिंदे काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा :

मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य

कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?

मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?