Ajit Pawar यांच्या अकस्मात निधनानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी (Maharashtra politics) उलथापालथ झाली आहे. 28 जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघातात त्यांचे निधन झाले आणि त्यानंतर केवळ तीन दिवसांत Sunetra Pawar यांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेत नवी जबाबदारी स्वीकारली. सध्या त्या Nationalist Congress Party च्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेत्या म्हणून कार्यरत असून पक्षाला एकसंध ठेवत पुढील राजकीय दिशा ठरवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Maharashtra politics) दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणाबाबत चर्चांना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर Sharad Pawar यांच्या गटातील काही नेत्यांसोबत अनौपचारिक बैठका झाल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. यामुळे राज्यातील सत्तासमीकरणांबाबत विविध तर्कवितर्क लावले जात आहेत.
दरम्यान, सुनेत्रा पवार यांनी आपल्या (Maharashtra politics) मुलांसह पार्थ आणि जय पवार यांच्यासोबत राजकीय रणनीतीकार Naresh Arora यांची भेट घेतली. अरोरा यांच्या Design Box या कंपनीवर राष्ट्रवादी काँग्रेसची प्रतिमा उंचावण्याची जबाबदारी आहे. मागील विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या प्रचार रणनितीची आखणी करण्यात डिझाईन बॉक्सने महत्त्वाची भूमिका बजावल्याचे मानले जाते. त्या यशानंतर अजित पवार यांचा या कंपनीवरील विश्वास अधिक दृढ झाला होता.
पुण्यातील जिजाई बंगल्यात पार्थ पवार, जय पवार आणि नरेश अरोरा (Maharashtra politics) यांच्यात सुमारे एक तास चर्चा झाली. त्यानंतर ते तिघे पुण्यातील सर्किट हाऊस येथे जाऊन सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. सुमारे तासभर चाललेल्या बैठकीत राष्ट्रवादीच्या भविष्यातील वाटचालीसह दोन्ही गटांच्या संभाव्य विलिनीकरणावर आणि राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
दरम्यान, Rohit Pawar यांनी यापूर्वी असा आरोप केला होता की, अजित पवार (Maharashtra politics) हे डिझाईन बॉक्स कंपनीसोबतचा करार रद्द करण्याच्या विचारात होते. या आरोपामुळे पक्षांतर्गत राजकारणाला वेगळी दिशा मिळाली आहे. मात्र, याबाबत अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही. सध्याच्या घडामोडींमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढील राजकीय धोरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार