राज्यातील राजकारणाला कलाटणी देणाऱ्या घडामोडींनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या (Congress Party) दोन्ही गटांच्या विलीनीकरणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दिवंगत नेते Ajit Pawar यांच्या निधनानंतर त्यांच्या पत्नी Sunetra Pawar यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्याने सत्तासमीकरणांमध्ये मोठा बदल झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर विलीनीकरणाबाबत सुरू असलेल्या चर्चांना नव्याने उधाण आले आहे.
Sharad Pawar यांच्या गटाकडून असा दावा करण्यात येत आहे की, दादा जिवंत असताना दोन्ही गटांमध्ये सकारात्मक चर्चा झाली होती आणि एकत्र येण्याचा निर्णय जवळपास निश्चित झाला होता. मात्र अजित पवार गटातील काही नेत्यांकडून हे दावे फेटाळण्यात आले आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष Shashikant Shinde यांनी महत्त्वपूर्ण भूमिका स्पष्ट केली आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना शिंदे यांनी सांगितले की, दादा (Congress Party) असताना दोन्ही पक्षांच्या एकत्रीकरणाबाबत निर्णय झाला होता, अशी चर्चा त्यांच्या पक्षातील अनेक जण करत आहेत. मात्र दादांच्या निधनानंतर या विषयावर आम्ही अधिक काही बोललेलो नाही. आम्ही केवळ दादांची इच्छा पूर्ण व्हावी एवढेच म्हटले होते. परंतु आता हा विषय पुढे न नेण्याचा निर्णय घेतला असून आम्ही विलीनीकरणाच्या मागे लागलो आहोत असे चित्र निर्माण करणे चुकीचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
विलीनीकरणाला काही नेत्यांचा विरोध असल्याबाबत विचारले असता, त्या संदर्भात संबंधित नेत्यांनीच आपली भूमिका मांडावी, असे सांगत शिंदे यांनी भाष्य टाळले. पक्ष संघटन मजबूत करण्यावर सध्या भर देण्यात येत असून पुन्हा जोमाने कामाला लागण्याची भूमिका आम्ही घेतली आहे, असे त्यांनी नमूद केले.
विलीनीकरणानंतर सत्तासमीकरणात बदल होऊन (Congress Party) राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहायचे की वेगळी दिशा घ्यायची, याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. यावर बोलताना शिंदे यांनी सांगितले की, कोणताही अंतिम निर्णय जिल्हा परिषद निवडणुकीच्या निकालानंतर घेण्याचे ठरले होते. मात्र आता त्या संदर्भात काय निर्णय झाला असता, यावर भाष्य करणे योग्य ठरणार नाही. पुढे राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहायचे की नाही, हा निर्णय सुनेत्रा पवार यांचाच अधिकार असेल, असे त्यांनी सूचित केले.
दरम्यान, राज्याच्या राजकारणात पुढील काही दिवसांत आणखी हालचाली होण्याची शक्यता वर्तवली जात असून राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांचे भवितव्य काय ठरणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार