फेब्रुवारीची सुरुवात होताच राज्यात उन्हाचा कडाका वाढल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. (summer) सकाळच्या वेळेत किंचित गारवा जाणवत असला तरी दुपारपर्यंत सूर्य डोक्यावर येताच तापमान झपाट्याने वाढताना दिसत आहे. अजून अधिकृत उन्हाळा सुरू व्हायचा असतानाच उकाड्याची चाहूल लागल्याने यंदा उन्हाळा किती तीव्र असेल, अशी चर्चा सुरू झाली आहे.दरम्यान, उत्तर भारतात सातत्याने सक्रिय असलेल्या वेस्टर्न डिस्टरबन्समुळे देशाच्या हवामानात वेगाने बदल होत आहेत. या प्रणालीचा परिणाम महाराष्ट्रावरही दिसू लागला आहे. सध्या बहुतांश भागात कोरडे वातावरण असले तरी अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या आर्द्र वाऱ्यांमुळे जमिनीवर कमी दाबाचा पट्टा तयार होत आहे. त्यामुळे येत्या 17 आणि 18 फेब्रुवारीदरम्यान राज्यातील काही भागात हलक्या पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

पुणे विभागासह मध्य महाराष्ट्रातील (summer) काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे. मुसळधार पावसाची शक्यता नसली तरी फेब्रुवारी महिन्यातील अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांवर परिणाम होऊ शकतो. तापमानात होणाऱ्या चढ-उतारामुळे शेती आणि आरोग्य या दोन्ही क्षेत्रांवर परिणाम जाणवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.याचदरम्यान उत्तर-पश्चिमेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग वाढला आहे. डोंगराळ भागात झालेल्या बर्फवृष्टीमुळे या वाऱ्यांमध्ये अधिक थंडावा निर्माण झाला असून राज्यातील किमान तापमानात गेल्या काही दिवसांत घट नोंदवली गेली आहे. उत्तर महाराष्ट्र, विदर्भ आणि खान्देश भागात रात्रीच्या गारव्यात वाढ झाल्याचे चित्र आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये मात्र गेल्या चार दिवसांपासून (summer) तापमान 32 अंशांच्या पुढे गेले आहे. शहर आणि परिसरात उकाड्यात सातत्याने वाढ होत असून वातावरणातील गारवा कमी झाल्याचे नागरिक सांगत आहेत. दिवसा वाढलेला उष्मा आणि रात्रीही जाणवणारा उकाडा यामुळे उन्हाळ्याची चाहूल अधिक तीव्र झाली आहे. कमाल आणि किमान तापमानातील वाढ लक्षात घेता पुढील काळात हवामानात आणखी चढ-उतार होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?