मुंबई या मायानगरीत स्वतःचं घर असावं, हे अनेकांचं स्वप्न असतं. मात्र वाढत्या (Mumbai) घरांच्या किमती पाहता ते स्वप्न पूर्ण करणं सोपं नाही. अशा परिस्थितीत मुंबईत तयार झालेल्या एका साडीची किंमत तब्बल ३९ कोटी रुपये असल्याची बातमी समोर आली असून ती सध्या देशभर चर्चेचा विषय ठरली आहे. या रकमेतील मुंबईत अनेक आलिशान फ्लॅट्स खरेदी करता येतील, इतकी ही साडी महाग आहे.
ही अनोखी साडी प्रसिद्ध डिझायनर रोहित पिसाळ यांनी तयार केली आहे. ‘गोल्डमॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रोहित पिसाळ यांनी या साडीच्या माध्यमातून एक वेगळाच कलात्मक नमुना साकारला आहे. साडीचे फोटो आणि व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या भव्यतेचं कौतुक केलं आहे.

मिळालेल्या (Mumbai) माहितीनुसार, ही साडी रमाबाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समर्पित करण्यात आली आहे. ही साडी तयार करण्यासाठी सुमारे तीन महिने लागले. विशेष कापडावर सोन्याचा मुलामा देण्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विशेष रसायनांचा वापर करण्यात आला. साडीवर रमाबाई आंबेडकर यांचं चित्र कोरले असून त्याभोवती सोन्याची नक्षी करण्यात आली आहे. त्यांच्या कपाळावरील टिकली तब्बल १०० ग्रॅम सोन्यापासून तयार करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे.
या साडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यामध्ये सुमारे ३३ कोटी रुपयांचे हिरे जडवण्यात आले आहेत. विविध प्रकारचे मौल्यवान हिरे साडीत कलात्मकरीत्या बसवण्यात आले असून त्यामुळे तिची किंमत गगनाला भिडली आहे. भारतीय पारंपरिक पोशाख आणि लक्झरी फॅशनचा हा संगम असल्याचं मानलं जात आहे.
मीडियारिपोर्टनुसार, या ३९ कोटी रुपयांच्या साडीचा लिलाव दुबई येथे होणार आहे. लिलावातून (Mumbai) मिळणारी रक्कम सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. नवीन रुग्णालये आणि शाळा उभारण्यासाठी निधी दिला जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.
ही साडी केवळ महागड्या किमतीमुळेच नव्हे, तर भावनिक समर्पण, कलात्मक कौशल्य आणि भारतीय परंपरेचा जागतिक पातळीवर गौरव करणाऱ्या प्रयत्नामुळेही विशेष ठरली आहे. भारतीय हस्तकलेची आणि लक्झरी फॅशन क्षेत्रातील सर्जनशीलतेची ही एक आगळीवेगळी ओळख ठरत आहे.
हेही वाचा :
मुलांसाठी विज्ञान-समर्थित आरोग्यपूरक: ‘वासु सुवर्णप्राशन ड्रॉप्स’चे फायदे आता क्लिनिकली मान्य
कुंडलीतील बुध ग्रह कमकुवत झाल्यास आयुष्यावर कसा होतो परिणाम ?
मोठी बातमी! एकनाथ खडसेंच्या अडचणी वाढल्या, सावदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, नेमकं काय आहे प्रकरण?