राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी राज्य (government schools) सरकारने मोठा निर्णय घेतला असून पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने 13 फेब्रुवारी रोजी यासंदर्भातील शासन निर्णय जारी केला असून या योजनेसाठी 165 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नवीन शैक्षणिक वर्षापासून या उपक्रमाची अंमलबजावणी होण्याची शक्यता आहे.

बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क (government schools) कायदा 2009 आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना अनुकूल व आनंददायी शैक्षणिक वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या सुमारे 41 लाख 43 हजार 54 विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. शिक्षण संचालकांनी सादर केलेल्या प्रस्तावानुसार निधी मंजूर करण्यात आला असून योजनेअंतर्गत दर्जेदार दप्तरांचा पुरवठा करण्यावर भर दिला जाणार आहे.
ज्या महानगरपालिकांमध्ये आधीपासूनच (government schools) अशा स्वरूपाची योजना राबवली जात आहे किंवा विद्यार्थ्यांना दप्तरासाठी स्वतंत्र निधी दिला जातो, त्या ठिकाणी या नव्या योजनेचा लाभ लागू होणार नाही. मात्र इतर सर्व सरकारी शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत दप्तर देण्यात येणार आहे. पालकांकडून या योजनेचे स्वागत करण्यात येत असले तरी पुरवण्यात येणारी दप्तरं चांगल्या प्रतीची असावीत, हलक्या दर्जाची किंवा बाजारगाळे साहित्य देऊ नये, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
सध्या सरकारी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना (government schools) मोफत पाठ्यपुस्तके आणि मध्यान्ह भोजन योजना दिली जाते. त्यात आता मोफत दप्तरांची भर पडल्याने पालकांवरील शैक्षणिक खर्चाचा भार आणखी कमी होणार आहे. मात्र या सर्व सोयी असूनही काही महापालिका आणि सरकारी शाळांमधील उपस्थिती कमी असल्याचे चित्र आहे. ग्रामीण भागात इंग्रजी माध्यमाच्या शाळांची वाढती क्रेझ आणि त्याचे आकर्षण यामुळे काही ठिकाणी सरकारी शाळांमध्ये प्रवेशसंख्या घटत आहे. परिणामी काही शाळा बंद करण्याची किंवा दोन शाळांचे एकत्रिकरण करण्याची वेळ येत आहे. त्यामुळे केवळ सुविधा वाढवण्याबरोबरच शैक्षणिक गुणवत्ता, पायाभूत सुविधा आणि विश्वासार्हता वाढवण्यावरही भर देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
हेही वाचा :
घरात हत्तीची मूर्ती कोणत्या दिशेने ठेवावी, नियम आणि फायद्यांबद्दल माहिती आहेत?
या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार