जेवताना फोन बघणं हा प्रत्येक व्यक्तीचा छंदच झाला आहे.(eating)माणसाला प्रत्येक कामात आणि अगदी झोपताना त्याचा मोबाईल हवा असतो. डिजिटल युगातला हा बदल तरुणाईसाठी घातक ठरणार आहे. कारण संशोधनात असं आढळलं की, जेवताना मोबाईल वापरणं किंवा टीव्ही पाहणं शरीरावर नकारात्मक परिणाम करतं. याने तुमच्या मेंदूवर मोठ्या प्रमाणात परिणाम होतो. याबद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात.

हेल्थलाइनच्या रिपोर्टनुसार बीजिंग युनिव्हर्सिटीने या विषयावर सविस्तर संशोधन केलं आहे.(eating) यावर आधारित लेख हिंदूस्तान या वेबसाईवर प्रसारित करण्यात आला. त्यामध्ये तज्ज्ञ म्हणाले की, जेवताना मोबाईल पाहिल्याने व्यक्तीचं लक्ष अन्नाकडे न राहता स्क्रीनकडे जातं. त्यामुळे मेंदूला पोट भरल्याची नीट जाणीव होत नाही. पोट भरल्याचा संकेत देणारे हार्मोन्स व्यवस्थित रिलीज होत नाहीत आणि व्यक्ती हळूहळू गरजेपेक्षा जास्त खाण्याची सवय लावून घेतो. जी त्याच्यासाठी हानिकारक ठरू शकते.संशोधनात असंही नमूद केलंय की, जेवताना लक्ष विचलित झालं तर अन्नाचा वास आणि चव याकडे लक्ष जात नाही. त्यामुळे खाण्याचा आनंदही कमी होतो. याचा परिणाम असा होतो की, एखाद्या व्यक्तीला घरगुती अन्नापेक्षा प्रोसेस्ड आणि बाहेरचं जंक फूड जास्त आवडू लागतं. सतत अशी सवय राहिली तर मेटाबॉलिज्मवर वाईट परिणाम होतो आणि तब्येत हळूहळू बिघडते.

जेवताना स्क्रीन टाइम वाढल्यामुळे फक्त लठ्ठपणाचाच धोका वाढत नाही (eating)तर टाइप-2 डायबिटीज, हाय ब्लड प्रेशर आणि मेटाबॉलिक सिंड्रोमसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. जेवताना लक्ष न लागल्यामुळे काही लोक खूप पटाटप जेवतात, तर काही जण खूप हळू खातात. या चुकीच्या सवयींमुळे डायबिटीज, किडनीशी संबंधित आजार आणि हाय ब्लडप्रेशरचा धोका जास्त वाढतो. त्यामुळे आरोग्य तज्ज्ञ जेवताना मोबाईल किंवा टीव्हीपासून दूर राहण्याचा सल्ला देतात.
हेही वाचा :
महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?
लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!