बॉलिवूड अभिनेता गोविंदा सध्या वैयक्तिक आयुष्य आणि आर्थिक(selling)स्थितीमुळे चर्चेत आहे. शाळा, कॉलेज आणि खासगी कार्यक्रमांमध्ये तो नृत्य सादर करत असल्याने त्याच्या दिवाळखोरीच्या अफवा पसरल्या होत्या. मात्र आता या चर्चांवर त्याच्या मॅनेजरने स्पष्ट भूमिका मांडत, गोविंदाच्या घराबाबतही महत्त्वाचा खुलासा केला आहे.काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये गोविंदा साध्या टॅक्सीमधून प्रवास करताना दिसत होता. यावरून नेटकऱ्यांनी त्याचा पडता काळ सुरू झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या. एकेकाळी बीएमडब्ल्यू आणि मर्सिडीज-बेंझ सारख्या आलिशान गाड्यांत फिरणाऱ्या अभिनेत्याला आता टॅक्सीचा आधार घ्यावा लागत असल्याची चर्चा रंगली होती. त्याचवेळी, तो शाळा आणि छोट्या कार्यक्रमांत नृत्य सादर करत असल्यामुळे त्याला पैशांची गरज असल्याचेही म्हटले जात होते.

या सर्व चर्चांवर गोविंदाचे मॅनेजर शशी सिन्हा यांनी प्रतिक्रिया दिली. (selling)त्यांनी सांगितले की, टॅक्सीने प्रवास करणे किंवा खासगी कार्यक्रमांमध्ये परफॉर्म करणे याचा त्याच्या आर्थिक अडचणींशी कोणताही संबंध नाही. गोविंदाकडे आजही एक नव्हे तर अनेक गाड्या आहेत. विमानतळावर खाजगी वाहनांना परवानगी नसल्यामुळे तो टॅक्सीने गेला होता, असेही त्यांनी स्पष्ट केले. परफॉर्मन्स हा गोविंदाचा व्यवसाय असून, त्यावरून तो दिवाळखोरीत असल्याचा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे सिन्हा म्हणाले.शशी सिन्हा यांनी पुढे गोविंदाच्या भूतकाळातील आर्थिक संघर्षांबाबतही माहिती दिली. त्यांनी सांगितले की, काही वर्षांपूर्वी गोविंदाने त्याच्या मुदत ठेवीतून पैसे काढले होते.
त्यातील काही रक्कम त्याने स्वतःच्या गरजांसाठी वापरली, (selling)तर काही रक्कम इतरांना मदत करण्यासाठी दिली. परिस्थिती अधिक कठीण झाल्यानंतर त्याला आपले घर गहाण ठेवावे लागले होते, असेही त्यांनी उघड केले. या कर्जाची परतफेड करण्यासाठी गोविंदा विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झाला आणि अनेक ठिकाणी नृत्य सादरीकरण केले. मात्र, त्याने कधीही कोणाकडे आर्थिक मदतीसाठी हात पसरला नाही, असे सिन्हा यांनी ठामपणे सांगितले. तसेच, गेल्या काही वर्षांत गोविंदाने एकही चित्रपट केला नसला तरी त्याला सतत डान्स परफॉर्मन्ससाठी बोलावले जाते आणि चित्रपटांसाठीही ऑफर्स येत राहतात, असेही त्यांनी नमूद केले. अनेकदा पटकथा न आवडणे किंवा इतर कारणांमुळे त्याने कोट्यवधींच्या ऑफर्स नाकारल्या असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी