अलिकडच्या काही वर्षांत भारतात कर्करोगाच्या रुग्णसंख्येत लक्षणीय वाढ होत (vegetarian)असल्याचे चित्र दिसून येत आहे. विशेषतः महिलांमध्ये आढळणाऱ्या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये वाढ होत असल्याने तज्ज्ञांमध्येही चिंतेचे वातावरण आहे. बदलती जीवनशैली, चुकीच्या आहाराच्या सवयी आणि शारीरिक हालचालींचा अभाव ही यामागची प्रमुख कारणे असल्याचे डॉक्टर सांगतात दरम्यान, नॉनव्हेज खाण्याच्या सवयींबाबत एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. जर तुम्ही नॉनव्हेज प्रेमी असाल तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरू शकते. ICMR च्या एका अभ्यासानुसार, ज्या महिलांच्या आहारात नॉनव्हेजचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्यात ब्रेस्ट कॅन्सरचा धोका इतर महिलांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे आहाराबाबत अधिक जागरूक राहण्याची गरज असल्याचे तज्ज्ञ सांगतात.

संशोधनातून असे स्पष्ट झाले आहे की, केवळ नॉनव्हेज खाणे हेच कॅन्सरचे एकमेव कारण नाही,(vegetarian) मात्र नॉनव्हेजसोबतच तळलेले-भाजलेले पदार्थ मोठ्या प्रमाणात खाल्ल्यास धोका वाढू शकतो. विशेषतः ज्या महिलांच्या शरीरात फॅट सेल्सचे प्रमाण जास्त आहे, त्यांच्यात हा धोका अधिक असल्याचे अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.तज्ज्ञांच्या मते, शरीरातील हार्मोन्सचे संतुलन बिघडणे, लठ्ठपणा आणि कुटुंबात याआधी कर्करोगाचा इतिहास असणे, या सर्व कारणांमुळे ब्रेस्ट कॅन्सरचा धोका अधिक वाढू शकतो. याशिवाय, वारंवार अर्धवट शिजलेले मांस किंवा अतिशय जास्त तळलेले पदार्थ खाल्ल्यास शरीरावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आहाराच्या सवयींकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते.
डॉक्टरांच्या मते, नॉनव्हेज पूर्णपणे बंद करणे आवश्यक नाही, मात्र त्याचे प्रमाण मर्यादित ठेवणे आणि योग्य प्रकारे शिजवलेले मांसच सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. चुकीच्या पद्धतीने शिजवलेले अन्न आणि सतत बाहेरचे खाद्यपदार्थ खाल्ल्यास कर्करोगासह इतर अनेक आजारांचा धोका वाढतो.कॅन्सर हा आजार तेव्हा होतो, जेव्हा शरीरातील काही पेशी अनियंत्रितपणे वेगाने विभाजित होऊ लागतात. या पेशी एकत्र येऊन ट्यूमर तयार करतात आणि हळूहळू आजूबाजूच्या निरोगी पेशींनाही प्रभावित करतात. कालांतराने हे ट्यूमर शरीराच्या इतर भागांमध्येही पसरू शकतात.

तज्ज्ञांच्या मते, कॅन्सर होण्यामागे आपल्या जीवनशैलीचा मोठा वाटा असतो.(vegetarian) चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव, लठ्ठपणा आणि डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधांचे सेवन या सवयी कॅन्सरचा धोका वाढवू शकतात. त्यामुळे संतुलित आणि पौष्टिक आहार, नियमित व्यायाम किंवा चालणे, तसेच शरीरातील कोणतेही बदल वेळेवर ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.जर शरीरात कुठेही गाठ, वेदना किंवा असामान्य बदल दिसून आले, तर त्याकडे दुर्लक्ष न करता तात्काळ वैद्यकीय तपासणी करणे गरजेचे आहे. वेळेवर योग्य पावले उचलल्यास कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येऊ शकतो, असे डॉक्टरांचे मत आहे.
हेही वाचा :
महायुतीचं टेन्शन वाढलं! अजितदादा भाजपची साथ सोडणार?
लाडक्या बहिणींना E-KYC संदर्भात मुदतवाढ मिळणार का? महत्वाची माहिती आली समोर
कोल्हापूर महानगरपालिकेची सर्वाधिक खर्चिक निवडणूक!Edit