जुना स्मार्टफोन बदलून नवीन फोन घेण्याचा विचार करत असाल, तर थोडी प्रतीक्षा करणं (Oppo) फायदेशीर ठरू शकतं. कारण ओप्पो आपला नवीन 5G स्मार्टफोन Oppo K14x 5G या आठवड्यात भारतीय बाजारात सादर करणार आहे. हा फोन 30 दिवसांच्या मोफत रिप्लेसमेंट ऑफरसह येणार असून, उत्पादन किंवा गुणवत्तेशी संबंधित समस्या आढळल्यासच ही सुविधा लागू होईल. विशेष म्हणजे, या स्मार्टफोनमध्ये 6500mAh क्षमतेची मोठी बॅटरी देण्यात आली आहे, जी दीर्घकाळ टिकणारी बॅटरी लाइफ देईल. यासोबतच हा फोन रिव्हर्स चार्जिंगलाही सपोर्ट करतो.

Oppo K14x 5G प्रिझम व्हायलेट (Oppo) आणि आइस ब्लू अशा दोन आकर्षक रंगांमध्ये लाँच केला जाणार आहे. कंपनीने या फोनमध्ये एआय आधारित फीचर्स दिले असून, आधुनिक तंत्रज्ञानाचा अनुभव देण्यावर भर दिला आहे. ओप्पोचा हा आगामी 5G स्मार्टफोन उद्या, 10 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12 वाजता अधिकृतपणे लाँच होणार आहे. लाँचनंतर हा फोन ओप्पोच्या अधिकृत वेबसाइटवर तसेच ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होईल.
या स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट आणि 1125 निट्स पीक ब्राइटनेसला सपोर्ट करणारा (Oppo) डिस्प्ले देण्यात आला आहे, त्यामुळे व्हिडीओ पाहणे आणि गेमिंगचा अनुभव अधिक स्मूथ होणार आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस 50 मेगापिक्सेलचा एआय प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे, जो चांगल्या दर्जाचे फोटो काढण्यास मदत करेल. फोनला पॉवर देण्यासाठी 45W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 6500mAh क्षमतेची बॅटरी देण्यात आली असून, कमी वेळात चार्ज होऊन दीर्घकाळ वापरता येईल.
या ओप्पो स्मार्टफोनची किंमत सुमारे 15 हजार रुपयांच्या आसपास (Oppo) असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, कंपनीकडून अद्याप अधिकृत किंमत जाहीर करण्यात आलेली नाही. लाँचिंगच्या वेळीच अंतिम किंमत समोर येईल. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या Oppo K13x 5G फोनच्या किमती पाहिल्या तर 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 15,999 रुपये, 6GB/128GB व्हेरिएंटची किंमत 16,999 रुपये, तर 8GB/128GB व्हेरिएंटची किंमत 18,999 रुपये आहे. हे सर्व व्हेरिएंट्स सध्या फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.
हेही वाचा :
हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा
प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….
IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी