भारत सरकारने Deepfake सह AI वरुन तयार केल्या जाणाऱ्या कंटेटच्या (content) बाबतीत ऑनलाइन प्लेटफॉर्म्ससाठी नियम अधिक कठोर केले आहेत. मायक्रोब्लॉगिंग प्लेटफॉर्म X आणि Instagram प्लेटफॉर्म्सना न्यायालयाकडून आदेश मिळाल्यानंतर AI कंटेट तीन तासात हटवावा लागणार आहे. सरकारने माहिती तंत्रज्ञान नियम 2021 मध्ये संशोधन केलं आहे. नवीन नियम 20 फेब्रुवारी 2026 पासून लागू होईल. सोशल मीडिया प्लेटफॉर्मना सरकार किंवा न्यायालयाच्या आदेशांवर आता 36 तासांऐवजी 3 तासांच्या आत कारवाई करावी लागणार आहे. त्या शिवाय यूजर्सच्या तक्रार निवारणाची काल मर्यादा कमी केली आहे.

या नव्या नियमातून काही गोष्टी बाहेर ठेवण्यात आल्या आहेत.(content) उदहारणार्थ सामान्य संपादन, कुठलं साहित्य चांगलं बनवणं किंवा चांगल्या हेतूने शैक्षणिक आणि डिझाइन्स यांना बाहेर ठेवलं आहे.नियमांनुसार एआय कंटेटला लेबलिंग अनिवार्य आहे. बनावटी कंटेट बनवणाऱ्या किंवा शेअर करण्याची सुविधा देणाऱ्या प्लॅटफॉर्मससाठी स्पष्टपणे म्हटलय की, प्रामुख्याने लेबल लावलं जाईल हे सुनिश्चित करावं लागलं. टेक्निकली जिथे शक्य असेल तिथे स्थायी मेटाडेटा सोबत जोडलं पाहिजे. इंटरमीडियरीजने प्लेटफॉर्म एकदा एआय लेबल लावल्यानंतर ते लपवण्याची किंवा हटवण्याची परवानगी देता येणार नाही हे अधिसूचनेत स्पष्टपणे म्हटलं आहे.

भारताने एआय स्टार्टअप सर्वम एआयने सर्वम व्हिजन नावाचे प्रगत (content) मल्टिमॉडल लाँच केले आहे. हे मॉडेल दस्ताऐवजाची बुद्धिमत्ता, ऑप्टिकल कॅरेक्टर रिकग्निशन देशाच्या विविध भाषा, लिपी दृश्य भाषा समज यासाठी सक्षम ठरले आहे. हे नवीन एआय मॉडेल जेमिनी 3 प्रो, GPT-5.2 सोबतच आघाडीच्या इतर एआय मॉडेलपेक्षा सरस ठरल्याचा दावा करण्यात येतोय. सर्वम एआयच्या माहितीनुसार, हे अत्याधुनिक सर्वम व्हिजन बहुभाषिक मॉडेल आधुनिक इंग्रजी दस्तऐवज प्रक्रियेसाठी तयार करण्यात आले आहे. भारताचे बहुतांश ज्ञान हे विविध ऐतिहासिक शिलालेख, ताडपत्रावरील मजकूर, जुने ग्रंथ, अभिलेखांमध्ये दडलेले आहे. हे प्रगत तंत्रज्ञान त्याचा गाभा समजून घेऊन त्या काळातील ज्ञान जगासमोर आणणार आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटीEdit