भारतीय ऑटो बाजारात इलेक्ट्रिक कार्सची मागणी वेगाने वाढताना दिसत आहे.(Vehicles)पर्यावरणपूरक आणि इंधन बचतीच्या दृष्टीने भारतीय ग्राहक आता मोठ्या प्रमाणात इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. याच पार्श्वभूमीवर जानेवारी २०२६ मधील इलेक्ट्रिक कार विक्रीचे आकडे समोर आले असून, त्यातून बाजारातील बदलती दिशा स्पष्ट होत आहे. ताज्या अहवालानुसार, मागील महिन्यात देशभरात एकूण १८ हजार ४२ इलेक्ट्रिक कार्सची विक्री झाली आहे. याआधी जानेवारी २०२५ मध्ये ही विक्री ११ हजार ९०९ युनिट्स इतकी होती. त्यामुळे वर्षानुवर्षांच्या तुलनेत तब्बल ५१ टक्क्यांची लक्षणीय वाढ नोंदवण्यात आली आहे.

इलेक्ट्रिक कार विक्रीत टाटा मोटर्सने पुन्हा एकदा आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.(Vehicles) विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक वाहने उपलब्ध करून देणाऱ्या टाटा मोटर्सने जानेवारी २०२६ मध्ये ७ हजार ८५२ युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही विक्री ५ हजार २९२ युनिट्स इतकी होती. त्यामुळे टाटा मोटर्सची आघाडी आणखी मजबूत झाल्याचे दिसते.दुसऱ्या क्रमांकावर एमजी मोटर्सने आपले स्थान कायम राखले आहे. स्वस्त इलेक्ट्रिक कारपासून ते प्रीमियम सेगमेंटमधील मॉडेल्सपर्यंत विविध पर्याय देणाऱ्या एमजीने जानेवारी महिन्यात ४ हजार ६०६ युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी याच कालावधीत ही संख्या ४ हजार ५२७ इतकी होती.
महिंद्राने इलेक्ट्रिक एसयूव्ही सेगमेंटमध्ये मोठी झेप घेत तिसरे स्थान मिळवले आहे. (Vehicles)जानेवारी २०२६ मध्ये कंपनीने ३ हजार ५८९ इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. विशेष म्हणजे, जानेवारी २०२५ मध्ये ही विक्री केवळ ७३९ युनिट्स इतकी होती, त्यामुळे महिंद्रासाठी ही मोठी कामगिरी मानली जात आहे.चौथ्या क्रमांकावर व्हिनफास्ट या नव्या ब्रँडने आपली उपस्थिती नोंदवली आहे. २०२५ च्या मध्यात भारतात प्रवेश केलेल्या या कंपनीने जानेवारी २०२६ मध्ये ४३२ इलेक्ट्रिक कार्सची विक्री केली आहे. कमी कालावधीत मिळालेला हा प्रतिसाद उद्योगासाठी महत्त्वाचा मानला जात आहे.टॉप पाचमध्ये हुंडईचाही समावेश झाला आहे. हुंडईकडून विविध सेगमेंटमध्ये इलेक्ट्रिक कार्स ऑफर केल्या जात असून, जानेवारी २०२६ मध्ये कंपनीने ३२६ युनिट्सची विक्री केली आहे. मागील वर्षी याच महिन्यात ही संख्या ३३१ युनिट्स इतकी होती. एकूणच, वाढती मागणी आणि कंपन्यांची आक्रमक रणनीती पाहता, येत्या काळात भारतीय इलेक्ट्रिक कार बाजार आणखी वेगाने विस्तारेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढप