लाडक्या बहि‍णींना गुड न्यूज, मे महिन्याच्या हप्त्यासाठी सरकारने घेतला मोठा निर्णय,₹ १५०० कधी जमा होणार?

राज्यातील कोट्यवधी लाडक्या बहि‍णींसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. मे महिन्याच्या हप्त्या संदर्भात सरकारकडून पावले उचलण्यात आली आहेत. १५०० रूपयांच्या मे महिन्याच्या हप्त्यासाठी राज्याच्या सामाजिक न्याय विभागाकडून महिला व बालविकास विभागाला ३४४ कोटी रूपयांचा निधी वितरीत केला आहे. (installment) त्यामुळे राज्यातील लाडक्या बहि‍णींच्या खात्यावर कोणत्याही क्षणी मे महिन्याचा हप्ता जमा होऊ शकतो. सरकारकडून याबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली नाही. लवकरच महिला व बालविकास विभागाकडून यावर अधिकृत माहिती दिली जाईल, असे खात्रीलायक सूत्रांनी साम टीव्हीला बोलताना सांगितले.

ईकेवायसीनंतर राज्यातील तब्बल ८० लाख अपात्र लाडक्या बहिणींची नावे वगळल्याने लाभार्थ्यांमध्ये चिंता निर्माण झालेली आहे. (installment) त्यातच आता राज्य सरकारने मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी ३४४.७४ कोटी रुपयांना मंजुरी दिली आहे. भाजप आमदार मोनिका राजळे यांनी सोशल मीडिया पोस्ट करत लाभार्थ्यांना १२ ते १५ जून दरम्यान रक्कम मिळण्याची शक्यता वर्तवली आहे. पण राज्य सरकारच्या वरिष्ठ सूत्रांनी याला दुजोरा दिलेला नाही. सरकारकडून रक्कम वितरणाच्या वेळापत्रकाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

सरकारी ठरावानुसार सामाजिक न्याय विभागाने १० जून रोजी मे महिन्याच्या हप्त्याच्या वितरणासाठी ३४४.७४ कोटी रुपयांना मंजुरी दिली. ही रक्कम ‘लाडकी बहीण’ योजनेसाठीच्या राज्याच्या अर्थसंकल्पीय तरतुदीचा एक भाग असून मे महिन्याच्या वितरणासाठी आहे. मोठ्या प्रमाणावरील छाननी प्रक्रियेमुळे योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली आहे. दुसरीकडे अनेक लाभार्थी महिला मे महिन्याच्या हप्त्याबाबत वाट पाहत असतानाच ही घडामोड समोर आली आहे.राज्याने अलीकडेच ई-केवायसी आणि पात्रता पडताळणी मोहीम राबवली होती. (installment) त्यानंतर लाभार्थ्यांची संख्या ८० लाखांनी घटल्याचे वृत्त आहे. अपूर्ण ई-केवायसी प्रक्रिया आणि पात्रतेशी संबंधित इतर समस्यांमुळे ही संख्या घटल्याचे सरकारी अधिकाऱ्यांनी सांगितले. मुख्यमंत्री माझी लडकी बहीण योजना २०२४ मध्ये महायुती सरकारने सुरू केली होती आणि याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते.

हेही वाचा :

सह्याद्री एक्स्प्रेस पुन्हा मुंबईपर्यंत धावणार?

तलावात बुडून माय-लेकीचा मृत्यू

सोनसाखळी चोरणारे चौघे जेरबंद