राज्यातील शहरी भागांमध्ये वन्यप्राण्यांचा वावर वाढत असल्याने नागरिकांच्या सुरक्षेचा (wildlife) प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुंबईतील मुलुंड पश्चिम येथील सरदार तारासिंग उद्यानाजवळ असलेल्या साई प्रस्थ परिसरात बिबट्या आढळल्याने स्थानिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून रात्री उशिरा बिबट्या या परिसरात शिरल्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, त्याने एका कुत्र्याची शिकार केल्याचे स्पष्ट दिसून आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून रात्रीच्या वेळी घराबाहेर पडण्याबाबत भीती व्यक्त केली जात आहे.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या अनेक भागांमध्ये अद्याप संरक्षक भिंत (wildlife) नसल्याने बिबटे शिकारीच्या शोधात वारंवार नागरी वस्तीत शिरत असल्याचे दिसून येते. घाटकोपर ते मुलुंड या परिसरात यापूर्वीही बिबट्यांच्या हल्ल्यांच्या घटना घडल्या असून त्यात काही नागरिकांचा मृत्यू झाला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. नागरी वस्तीत कुत्र्यांची शिकार करण्याच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमधील भीती अधिक तीव्र होत आहे. या पार्श्वभूमीवर संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या सिमेवर तातडीने संरक्षक भिंत उभारण्याची मागणी खासदार संजय दिना पाटील यांनी पुन्हा एकदा केली आहे. या विषयावर पालिका आयुक्त भुषण गगराणी आणि पालकमंत्र्यांशी अनेकदा चर्चा झाली असली, तरी प्रशासन या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याचा आरोप त्यांनी साई प्रस्थ घटनेनंतर केला आहे. सुदैवाने या घटनेच्या वेळी त्या ठिकाणी कोणतीही व्यक्ती उपस्थित नव्हती, मात्र एखादा नागरिक असता तर मोठी दुर्घटना घडू शकली असती, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मुंबईतील जुहू परिसरात (wildlife) वन्यजीव तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका घरातून जिवंत मगर आणि इंडियन स्पॉटेड कासव जप्त करण्यात आले असून ही कारवाई वन विभाग, मुंबई गुन्हे शाखेचे युनिट-9 आणि सर्प इंडिया या स्वयंसेवी संस्थेने संयुक्तपणे केली. बेकायदेशीररित्या हे प्राणी घरात ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी छापा टाकला. या प्रकरणी इम्रान शेख (वय 29) याच्याविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा 1972 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपीने हे दोन्ही प्राणी घरातील काचेच्या टँकमध्ये ठेवले होते. मगर आणि इंडियन स्पॉटेड (wildlife) कासव या दोन्ही शेड्युल-1 अंतर्गत संरक्षित प्रजाती असून त्यांचे पालन किंवा मालकी बेकायदेशीर आहे. जप्त करण्यात आलेल्या प्राण्यांना सुरक्षितपणे रेस्क्यू करून वन विभागाकडे सुपूर्द करण्यात आले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास जुहू पोलीस करत असून शहरातील वाढत्या वन्यजीव तस्करीच्या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा :

फक्त 1 रुपयासाठी या अभिनेत्याने नाकारलेला अमिताभ बच्चन यांचा चित्रपट

पाऊस पडूनही राज्याच्या अनेक भागात आतापासूनच पाणी टंचाई

प्रसिद्धीसाठी काय पण! हॉटेलमध्ये वेटरने मुलीसमोर अशी दाखवली क्रिएटिविटी पाहून तुम्हाला येईल संताप, Video प्रचंड व्हायरल