राष्ट्रवादीचे नेते, खासदार शरद पवार यांची प्रकृती बिघडल्यामुळे काल (health) संध्याकाळी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. बारामतीतून येथून पुण्यातील रुबी रुग्णालयात आणऊन त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले. बारामतीमध्ये असताना सकाळी डॉक्टरांची एक टीम शरद पवार यांची तपासणी करण्यासाठी गेली होती. त्यानंतर दुपारीदेखील पवारांच्या गोविंदबागेत डॉक्टरांची टीम गेली होती. अखेर त्यांना पुण्यात हलवण्यात आलं. त्यावेळी त्यांची कन्या सुप्रिया सुळे यादेखील उपस्थित होत्या. दरम्यान शरद पवार यांच्या प्रकृतीबद्दल रुग्णालयाकडून वेळोवेळी अपडेट्स देण्यात येत असून त्यांच्या प्रकृतीबद्दल आता नवी माहिती समोर आली आहे.

शरद पवारांच्या प्रकृतीबाबत रुबीहॉल क्लिनिक कडून महत्त्वाची (health)अपडेट देण्यात आली आहे. पवारांच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे, अशी माहिती रुग्णालयातील डॉक्टर सायमन ग्रँट यांनी सकाळी दिली. शरद पवारांची प्रकृती आता स्थिर असून ते बरे होत असल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं. काल त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांच्यावर काही उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना होत असलेला त्रास आता काही प्रमाणात कमी झाल्याचही डॉक्टरांचं म्हणणं आहे.मात्र खबरदारीचा उपाय म्हणून शरद पवारांना डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवण्यात आलं आहे. हॉस्पिटलच्या प्रोटोकॉलनुसार शरद पवारांवर उपचार सुरू आहे आणि त्यांच्या तब्येतीवर अतिशय बारकाईने लक्षात ठेवण्यात येत आहे असं सांगण्यात आलं. मात्र, कोणत्याही कार्यकर्त्यांनी आणि हितचिंतकांनी हॉस्पिटलच्या आवारात गर्दी करू नये असं आवाहन रुग्णालयाकडून करण्यात आलं आहे.

काल शरद पवार यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्यावर (health)त्यांना लवकर बरं वाटावं अशी प्रार्थना सर्वच जण करत आहेत. याच दरम्यान शरद पवारांच्या तब्येतीबाबत, प्रकृतीबाब विचारपूस करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फोन केला होता अशी माहिती देखील समोर आली आहे. नरेंद्र मोदींनी यांनी पवारांना फोन केला, त्यांच्या तब्येतीबाबत जाणून घेतलं. आज सकाळी पंतप्रधानांचं फोनवरून पवारांशी बोलणं झाल्याचं समजतं. दरम्यान पवारांच्या तब्येतीत सुधारणा होत असून त्यांना आज संध्याकाळी किंवा उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.

शरद पवार यांच्या तब्येतीबाबत त्यांच्या कन्येकडून, सुप्रिया सुळे(health) यांच्याकडूनही अपडेट देण्यात आली होती. त्यांनी एक ट्विट करत अपडेट दिले होते. खासदार सुप्रिया सुळे यांनीही त्यांचे वडील सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करून शरद पवारांच्या उपचारांबद्दल अधिक स्पष्ट माहिती दिली. ” बाबांना छातीत संसर्ग झाला असून त्यांना 5 दिवसांच्या अँटीबायोटिक्सचा कोर्स पूर्ण करावा लागणार आहे. सुदैवाने, इतर सर्व शारीरिक रिपोर्ट्स सामान्य आले आहेत. तुमच्या सर्वांच्या शुभेच्छा आणि पाठिंब्याबद्दल मी मनापासून आभारी आहे,” असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी