मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना (shocking)गोळ्या घालून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा एक ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या कथित कॉल रेकॉर्डिंगमध्ये कराड समर्थक असल्याचा दावा करणारी व्यक्ती थेट मनोज जरांगे पाटील यांना ठार मारण्याची भाषा करताना ऐकू येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या संभाषणात धनंजय मुंडे तसेच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड यांचेही नाव घेत धमकी दिल्याचे ऐकू येते.

व्हायरल ऑडिओमध्ये दोन व्यक्तींमधील संवाद असून,(shocking) त्यात एकजण “मी स्वतः गोळ्या घालतो” आणि “मनोज जरांगे यांना जीवच मारतो” अशा शब्दांत उघड धमकी देताना दिसतो. तसेच जरांगे समर्थकांनाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. हा ऑडिओ क्लिप सध्या विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झपाट्याने पसरत असून, यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.
मात्र, या व्हायरल कॉल रेकॉर्डिंगची कोणत्याही अधिकृत माध्यमांनी अथवा (shocking)संबंधित यंत्रणांनी अद्याप पुष्टी केलेली नाही. त्यामुळे या ऑडिओची सत्यता तपासली जाणे बाकी आहे. तरीही, अशा प्रकारच्या धमकीमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, अशी चिंता व्यक्त केली जात असून, या प्रकरणाकडे पोलीस आणि प्रशासन गांभीर्याने पाहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा :
महाराष्ट्रातील ग्रामपंचायतींच्या निवडणुका कधी होणार? तारखेबाबत महत्वाची अपडेट समोर
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढ
पुढील तीन दिवसांत पावसाचा अंदाज; ढगाळ हवामानामुळे थंडीत वाढप