पुढील दोन ते तीन दिवसांत विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता (Cloudy) असल्याचा अंदाज हवामान विभागाच्या नागपूर केंद्राने वर्तवला आहे. विशेषतः पश्चिम विदर्भातील अमरावती, अकोला, बुलढाणा आणि वाशीम या जिल्ह्यांमध्ये 2 ते 3 फेब्रुवारीदरम्यान हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागपूरसह संपूर्ण विदर्भात सध्या ढगाळ वातावरण पाहायला मिळत असून, याचा परिणाम तापमानावरही जाणवण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तरेकडून पश्चिमेकडे एक विक्षोभ सरकत आहे. या विक्षोभाचा परिणाम विदर्भावर होत असून, त्यामुळे आकाशात ढगांची दाटी निर्माण झाली आहे. याच हवामान प्रणालीमुळे पश्चिम विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाची परिस्थिती तयार झाली आहे. शेतीच्या दृष्टीने हा पाऊस काही प्रमाणात लाभदायक ठरू शकतो, मात्र कापूस, हरभरा व गहू पिकांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान, 15 जानेवारीनंतर विदर्भातील थंडीचा प्रभाव हळूहळू कमी होऊ लागला आहे.(Cloudy) सध्या विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांचे किमान तापमान 12 ते 16 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. ढगाळ वातावरणामुळे रात्रीच्या तापमानात काहीशी वाढ झाली असली, तरी पावसामुळे तापमानात किंचित घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे थंडी थोडी वाढल्यासारखी जाणवेल, असा अंदाज हवामान केंद्राने वर्तवला आहे. मात्र, पावसानंतर आकाश स्वच्छ झाल्यावर पुन्हा तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.धुळ्यात अवकाळी पाऊस, आमदार काशीराम पावरांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पाहणी केली
दरम्यान, विदर्भात उन्हाळ्याची चाहूल लागल्याचे संकेतही दिसू लागले आहेत.(Cloudy) डिसेंबर आणि जानेवारी या दोन महिन्यांत नागपूर व विदर्भात थंडीचा प्रभाव अधिक जाणवतो. मकरसंक्रांतीनंतर दिवस मोठा आणि रात्र लहान होऊ लागते. विशेषतः 15 जानेवारीनंतर तापमानात हळूहळू वाढ सुरू होते. सध्या काही भागांत झाडांची पानगळ सुरू झाली असून, पानगळ सुरू झाली की उन्हाळा जवळ आल्याचे संकेत मानले जातात.एकूणच, येत्या काही दिवसांत पश्चिम विदर्भात पावसाची शक्यता असून, त्यानंतर तापमानात चढ-उतार दिसून येतील. नागरिकांनी हवामानाच्या बदलत्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?