राज्याच्या राजकारणात वेगवान हालचाली सुरू आहेत.(meets) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे नेतृत्व कोण करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान आज विधीमंडळात पक्षाची अहत्वाची बैठक पार पडली. त्यात सुनेत्रा पवार यांना राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. तर सुनेत्रा पवार आज राज्याच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. संध्याकाळी 5 वाजता शपथविधी पार पडणार आहे.

दरम्यान सुनेत्रा पवार यांना पक्षाचे सर्वाधिकार देण्यात आले आहेत. (meets) व्हीप काढण्याचे अधिकार देखील सुनेत्रा पवार यांच्याकडे राहणार आहे. तसेच राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार यांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान यानंतर पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल आचार्य देवव्रत यांना यासंदर्भात पत्र पाठवले आहे.(meets) आज संध्याकाळी 5 वाजता सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत. शपथविधी झाल्यावर सुनेत्रा पवार तातडीने बारामतीला जाणार असल्याचे समजते आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दशक्रिया पार पडेपर्यंत सुनेत्रा पवार बारामतीमध्येच राहणार असल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?