महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना खूप चर्चेत आली आहे.(Benefits) लाडकी बहीण योजनेत महिलांना केवायसी करणे अनिवार्य केले होते. लाडकी बहीण योजनेत केवायसी न केल्याने अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. दरम्यान, केवायसी करुनदेखील अनेक महिलांचा लाभ बंद झाला आहे. केवायसीमध्ये चुकी झाल्यावरदेखील अनेक महिलांचे लाभ बंद झाले आहेत. लातूरमधील जवळपास ६१ हजार महिलांना पैसे मिळालेले नाहीत.

लातूरमध्ये साधारण 61 हजार लाडक्या बहि‍णींचा लाभ बंद झाला आहे. (Benefits) ई-केवायसीतील चुकीचा फटका बसला आहे. मागच्या दोन महिन्यापासून या लाडक्या बहिणीचं मानधन थकलं आहे. त्यांना ३००० रुपये मिळालेले नाही.या लाडक्या बहिणींचे आर्थिक नियोजन कोलमोडत असल्याने या बहिणींपुढे मोठा प्रश्न उभा राहिला आहे. अनेक महिलांनी ईकेवायसी करताना शासकीय नोकरी, एकच कुटुंबात इतर महिलांना लाभ घेत असल्याचा पर्याय निवडला आहे. याचसोबत आधारला मोबाईल नंबर लिंक नसणे या कारणांमुळे मानधन थकल्याचं सांगितलं जात आहे.

दुसरीकडे या लाडक्या बहिणींना दिलासाही देण्यात आला आहे. (Benefits) आज पासून जिल्ह्यात अंगणवाडी सेविकांच्या मदतीने प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे. यानंतर पुन्हा लाभाची संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यात एकूण 5 लाख 67 हजार 459 महिला लाभार्थ्यांची संख्या आहे. यातील ६१ हजार महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाही.

हेही वाचा :

तर सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री? मोठं भाकित समोर!

स्वप्नात वारंवार मृतदेह दिसणे म्हणजे मोठ्या संकटाची चाहूल, अजिबात करू नका दुर्लक्ष अन्यथा…

कोहलीवर हल्ला? आर अश्विनने तात्काळ विराटला लावला फोन, काय आहे प्रकरण?