मागील महिनाभरापासून हवेत असलेल्या गारव्यात गुरुवारी दि.२९ आणखी(weather) घट झाली होती. तर शुक्रवारी दि. ३० रोजी देखील हवामान अपेक्षेपेक्षा थंड राहिले. परिणामी, व्हायरल साथीच्या आजारांनी लहान मुलांसह ज्येष्ठ नागरिक त्रस्त झाल्याचे पाहायला मिळत आहे. उत्तरेकडील शितवारे महाराष्ट्रात दाखल होत असल्याने राज्यातील हवेत कमालीचा गारवा पसरला आहे. याचा परिणाम मराठवाड्यासह छत्रपती संभाजीनगर शहरातदेखील अनुभवण्यास येत आहे.

शहरात रोज बदलणाऱ्या वातावरणाचा फटका नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे. (weather)सर्दी, डोकेदुखी, अंगदुखीसह ताप आणि व्हायरल आजारांनी डोके वर काढले आहे. मागील तीन दिवसांत क्लिनिकमध्ये रुग्णांची संख्या वाढीस लागली आहे. तरुणांच्या तुलनेत लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना हवामान बदलाचा अधिक परिणाम होतो. लहान मुले आणि ज्येष्ठांना सर्दीमुळे छातीत कफ होणे आणि श्वसनाच्या तक्रारी सुरु झाल्या आहेत. अशावेळी थंड पाणी पिणे टाळणे, पहाटे, सायंकाळी आणि रात्रीच्या गारव्यात बाहेर पडणे टाळणे आवश्यक आहे.
शहरात शुक्रवारी दिवसभर ढगाळ वातावरण होते. (weather)पहाटे, सायंकाळी आणि रात्री कमालीचा गारवा अनुभवायला मिळाला. ढगाळ वातावरणासह किमान तापमानासह कमाल तापमानदेखील घसरल्याने हवेत कमालीचा गारवा पसरला होता. गुरुवारी किमान तापमानात अडीच अंशाची घट होऊन किमान तापमान १४.८ अंश सेल्शिअसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने घेतली होती तर शुक्रवारीदेखील वातावरण थंड होते. कमाल २९.४ तर किमान तापमान १६.२ अंश सेल्शियसची नोंद चिकलठाणा वेधशाळेने केली.
शहरात जानेवारीच्या सुरुवातीला रात्रीचे तापमान १३ ते १४ अंश सेल्शियसच्या (weather)दरम्यान होते. जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात ते १० ते ११ अंशादरम्यान गेले. १३ जानेवारीपासून तापमानात वाढ होण्यात सुरुवात झाली. हवेतील आर्द्रता सकाळी ६८ टक्के तर सायंकाळी ५० टक्के इतकी राहिली. ३१ जानेवारीपर्यंत कमाल तापमान ३० ते ३१ अंशापर्यंत जाण्याची शक्यता असून १ ते ३ फेब्रुवारीदरम्यान किमान तापमानासह पुन्हा किंचित घट होऊन पारा १५ अंशापर्यंत खाली येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?