उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, (present) या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं, त्यांच्या निधनानंतर आता नवा उपमुख्यमंत्री कोण असणार? राष्ट्रवादीचा गटनेता कोण होणार? अशी चर्चा सुरू झाली होती, या सर्व पार्श्वभूमीला कालपासून राष्ट्रवादीच्या गोटात घडामोडींना वेग आल्याचं पहायला मिळत आहे. शुक्रवारीच सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार हे निश्चित झालं होतं. त्यानंतर आज सायंकाळी आता सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यापूर्वी राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांची एक महत्त्वाची बैठक मुंबईमध्ये पार पडली, या बैठकीला राष्ट्रवादीचे सर्व वरिष्ठ नेते देखील उपस्थितीत होते, या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांची गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे.

दरम्यान राष्ट्रवादीच्या गोटात या सर्व घडामोडी सुरू असतानाच (present) आज सकाळी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एक पत्रकार परिषद घेतली, या पत्रकार परिषदेमध्ये बोलताना त्यांनी मोठा खुलासा केला आहे, सुनेत्रा पवार आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, याबद्दल आपल्याला कोणतीही माहिती नाही, असं त्यांनी म्हटलं आहे, तसेच या संदर्भात त्यांच्याशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचंही पवार यांनी म्हटलं होतं, दरम्यान शरद पवार यांच्या या विधानानंतर शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता.
अखेर या संदर्भात आता मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे राष्ट्रवादी (present) शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबईला जाणार नाहीयेत, शरद पवार हे सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला हजर राहणार नसल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी दिली आहे.सुनेत्रा पवार या आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत, त्यांनी त्यापूर्वी आपल्या राज्यसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा देखील दिला आहे. तसेच त्यांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी देखील निवड करण्यात आली आहे. आज सायंकाळी 5 वाजता त्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री असणार आहेत.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?