अजित पवारांच्या अपघाती निधनाने महाराष्ट्रासहित राष्ट्रवादी पक्षावर (plane) दु:खाचा डोंगर कोसळला आहे. विमान कोसळल्यानंतर क्षणार्धात स्फोट झाला. या घटनेत अजित पवारांसहित ५ जणांचं अकाली मृत्यू झाला. विमानाचा अपघात नेमका कसा झाला, याचे अनेक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विमानाच्या अपघातावेळी पायलट आणि अजित पवारांचं काय बोलणं झालं, याचा उलगडा ब्लॅक्स बॉक्समधून होणार आहे. यावर आमदार जयंत पाटील यांनी मोठं भाष्य केलं.आमदार जयंत पाटील हे आज सांगलीत आहेत. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजित पवारांच्या विमान अपघातावर मोठं भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले, ‘ब्लॅक बॉक्स मिळाला की बऱ्याचशा गोष्टी स्पष्ट होतील. प्रचंड आवाज येत होता. त्यामुळे ते खाली कोसळले, याचा तपशील ब्लॅक बॉक्समध्ये असेल असे अपेक्षा आहे. विमानातील शेवटचं बोलणं काय असेल, तेही समोर येईल. ब्लॅक बॉक्स समोरचे सर्व सत्य बाहेर आले तर सर्व निष्कर्ष बाहेर येतील’.

‘धावपट्टीला धडकलं, मग त्याचा स्फोट झाला हे समजू शकतो. (plane) खाली पडणार हे मला कळलं नाही, मी त्यात एक्सपर्ट नाही. त्यामुळे एक्सपर्टचं म्हणणं महत्वाचं आहे. पण ब्लॅक बॉक्स मिळेल, त्यावेळी नक्की कळेल, असेही ते म्हणाले.अजित पवार गटाच्या बैठकीवर जयंत पाटील यांनी मोठं भाष्य केलं. जयंत पाटील म्हणाले, ‘शरद पवारांच्या देखतच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हायची ही अजित पवारांची इच्छा होती. अलीकडच्या काळात बऱ्याच वेळा अजित पवार हे स्वतः माझ्या घरी आले होते. ते चार वेळा माझ्या घरी येऊन जेवण करून चर्चा पूर्ण करून गेले आहेत. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्र करण्यासाठी माझ्या घरी आठ ते दहा वेळा चर्चा झालीये’.
‘अजितदादांना शरद पवारांविषयी प्रचंड आदर होता. जे झालं ते विसरून जाऊ, (plane) त्यानंतर पुढे महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जोमाने पुढे नेण्याची,अजितदादांची तीव्र आणि आग्रही भूमिका होती. 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याचा निर्णय जाहीर होणार होता. अजित पवारांनी माझ्यावर तारीख ठरवण्याची जबाबदारी सोपवली होती. 16 जानेवारी रोजी पार पडलेल्या अजितदादा यांच्यासोबत बैठकीत हा निर्णय झाला होता’.
हेही वाचा :
लाडक्या बहिणींना धक्का! या जिल्ह्यातील ६१ हजार महिलांचा लाभ बंद
इलेक्ट्रिक कारचे स्वप्न सामान्यांच्या आवाक्यात!
फॅन्स घाबरले ना… Virat Kohli चे Instagram अचानक बंद, नेमके काय झाले?