आजकाल अनेकांची सकाळ डोळे उघडताच मोबाईल पाहून सुरू होते. किती वाजले आहेत, व्हॉट्सअॅपवर कोणाचा मेसेज आलाय का, इन्स्टाग्रामवर पोस्ट किंवा रीलला किती लाइक्स आणि कमेंट्स मिळाले आहेत, ई-मेल किंवा बातम्या तपासणं अशा गोष्टी अनेक जण उठल्या उठल्या करतात. पण डॉक्टरांच्या मते, सकाळी उठल्यानंतर लगेच मोबाईल पाहण्याची ही सवय मेंदू आणि मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे दिवसभर तणाव, चिडचिड, चिंता किंवा मन अस्वस्थ राहण्यामागे हे एक कारण असू शकतं.तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेतून उठल्यानंतरची पहिली काही मिनिटं मेंदूसाठी खूप महत्त्वाची असतात. या काळात मेंदू हळूहळू झोपेच्या अवस्थेतून पूर्णपणे जागृत अवस्थेत येत असतो. (mobile phones) अशावेळी अचानक मोबाईलवर आलेले नोटिफिकेशन्स, मेसेज किंवा सोशल मीडियावर काही माहिती पाहिली तर मेंदूवर अतिरिक्त ताण येऊ शकतो.

डॉ. कुनाल सूद यांच्या मते, सकाळी उठल्यानंतर शरीरात नैसर्गिकरित्या कॉर्टिसॉल चं प्रमाण वाढतं. हा शरीराला जागं करण्याचा नैसर्गिक भाग आहे. पण त्याच वेळी ई-मेल, बातम्या, सोशल मीडिया पोस्ट किंवा इतर माहिती पाहिली, तर तणावाची पातळी अजून वाढू शकते मोबाईलवर येणारे नोटिफिकेशन्स आपलं लक्ष लगेच वेधून घेतात. त्यामुळे मेसेज किंवा अपडेट दिसताच ते लगेच पाहावंसं वाटतं. वारंवार असं झाल्यानं लक्ष एका गोष्टीवर केंद्रित ठेवणं कठीण होऊ शकतं आणि एकाग्रतेवर परिणाम होऊ शकतो.तज्ज्ञ सांगतात की अनेक लोक रात्री काय घडले असेल हे जाणून घेण्यासाठी सकाळी उठताच फोन तपासतात. (mobile phones) त्यामुळे काही क्षणांसाठी चिंता कमी झाल्यासारखी वाटते. मात्र हीच सवय पुढे चिंता वाढवणारे चक्र तयार करू शकते.याशिवाय मोबाईलवर एकाच वेळी मेसेज, कामाशी संबंधित सूचना, सोशल मीडियावरील अपडेट्स आणि बातम्यांचा सतत मारा होत असल्यानं मेंदूवर माहितीचा प्रचंड ताण येतो. परिणामी, दिवसाची सुरुवात स्वतःच्या प्राधान्यांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी इतरांच्या मागण्यांना प्रतिसाद देण्यातच होते.
बेंगळुरू येथील मेंदू व मणक्याचे तज्ज्ञ डॉ. जगदीश चट्टनल्ली यांच्या मते, उठल्यानंतर लगेच फोन वापरला, तर शरीरातील ‘फाइट ऑर फ्लाइट’ प्रतिक्रिया सक्रिय होऊ शकते. (mobile phones) त्यामुळे चिंता, चिडचिड, लक्ष केंद्रित करण्यात अडचण आणि मानसिक थकवा जाणवू शकतो.तज्ज्ञांच्या मते, दीर्घकाळ अशी सवय राहिल्यास झोपेच्या समस्या, मानसिक थकवा आणि तणावाशी संबंधित इतर आरोग्य समस्यांचा धोका वाढू शकतो.
सकाळी उठल्यानंतर काय करावे?
उठल्यानंतर किमान 20 ते 30 मिनिटे मोबाईलपासून दूर राहा.
पाणी प्या आणि काही मिनिटे शांत बसा.
हलका व्यायाम किंवा स्ट्रेचिंग करा.
ध्यान, प्राणायाम किंवा सकारात्मक विचारांनी दिवसाची सुरुवात करा.
दिवसातील महत्त्वाच्या कामांचे नियोजन करा.
सकाळची सुरुवात शांत आणि सकारात्मक पद्धतीने केल्यास दिवसभर मन अधिक स्थिर, एकाग्र आणि उत्साही राहण्यास मदत होऊ शकते.
हेही वाचा :
तृणमूलमधील फुटीमुळे भाजपला सुवर्णसंधी