टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून भारतीय संघाने (enthusiasm) पहिल्याच सामन्यात विजय मिळवत आपली ताकद दाखवून दिली आहे. अमेरिकेविरुद्ध झालेल्या या सामन्यात फलंदाजीची खरी कसोटी लागली होती, मात्र कठीण परिस्थितीतही टीम इंडियाने संयम आणि कौशल्याच्या जोरावर सामना आपल्या बाजूने वळवला. या विजयामुळे भारतीय संघाची विजयी घोडदौड अशीच सुरू राहावी, यासाठी क्रीडाप्रेमी प्रार्थना करत आहेत.
दरम्यान, स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने आपल्या नियमांची कठोर अंमलबजावणी सुरू ठेवली आहे. टी20 वर्ल्डकपदरम्यान भारतीय खेळाडूंना पत्नी, मंगेतर किंवा कुटुंबीयांसोबत राहण्यास परवानगी देण्यात आलेली नाही. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापनाने खेळाडूंच्या कुटुंबीयांना स्पर्धेदरम्यान सहभागी करण्याची परवानगी मागितली होती. मात्र बीसीसीआयने या मागणीला स्पष्ट नकार दिला आहे.

बीसीसीआयच्या नव्या नियमावलीनुसार, जर एखादा (enthusiasm) दौरा 45 दिवसांपेक्षा जास्त कालावधीचा असेल, तरच कुटुंबीयांना जास्तीत जास्त 14 दिवस संघासोबत राहण्याची मुभा दिली जाते. मात्र टी20 वर्ल्डकप स्पर्धा अवघ्या एका महिन्याची असल्याने या नियमांतर्गत कोणतीही सवलत देण्याचा प्रश्नच येत नाही. गेल्या वर्षभरापासून द्विपक्षीय मालिकांमध्येही खेळाडूंच्या कुटुंबीयांना संघासोबत राहण्यास परवानगी देण्यात आलेली नाही आणि हाच नियम आता वर्ल्डकपमध्येही कायम ठेवण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, टीम इंडिया व्यवस्थापनाने कुटुंबीय खेळाडूंसोबत प्रवास करू शकतात का किंवा एकत्र राहू शकतात का, याबाबत विचारणा केली होती. त्यावर बोर्डाने स्पष्ट भूमिका घेत कुटुंबीयांना खेळाडूंसोबत राहण्याची परवानगी दिली जाणार नसल्याचे सांगितले. मात्र कुटुंबीयांना स्वतंत्रपणे राहायचे असल्यास, त्यासाठी ते स्वतः व्यवस्था करू शकतात, असेही बीसीसीआयने स्पष्ट केले आहे. साखळी फेरीत भारतीय संघाचे तीन सामने भारतात, तर एक सामना श्रीलंकेत होणार आहे.

या कठोर नियमांच्या (enthusiasm) मागे मागील अनुभव कारणीभूत ठरले आहेत. 2025 मध्ये झालेल्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यात बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये भारताचा झालेला दारुण पराभव बीसीसीआयसाठी डोळे उघडणारा ठरला होता. कोविडनंतर खेळाडूंना कुटुंबीयांना सोबत ठेवण्याची मुभा देण्यात आली होती, मात्र काही खेळाडूंनी या सवलतीचा गैरवापर केल्याचे बोर्डाच्या लक्षात आले. कुटुंबीय सोबत असल्यामुळे काही खेळाडू संघाच्या बैठकींना गैरहजर राहत असल्याच्या तक्रारीही समोर आल्या, ज्याचा थेट परिणाम संघाच्या कामगिरीवर झाला. याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने पुन्हा एकदा जुन्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला असून, शिस्त आणि कामगिरी यांना सर्वोच्च प्राधान्य देण्याची भूमिका घेतली आहे.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी