अफगाणिस्तान क्रिकेट टीमने गेल्या टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेत (cricket) उल्लेखनीय कामगिरी करत उपांत्य फेरीत धडक दिली होती. अफगाणिस्तानने त्या स्पर्धेत भल्या भल्या संघांना पराभवाचं पाणी पाजत गार केलं होतं. अफगाणिस्तानने न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत करत उलटफेर केला होता. मात्र यंदा आयसीसी टी 20i वर्ल्ड कप स्पर्धेच्या 10 व्या पर्वात अफगाणिस्तानला अपेक्षित सुरुवात करता आलेली नाही. अफगाणिस्तानला या मोहिमेतील आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडकडून 5 विकेट्सने पराभूत व्हावं लागलं. न्यूझीलंडने यासह त्या पराभवाची परतफेड केली.

त्यानंतर आता अफगाणिस्तान आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 (cricket) स्पर्धेत आपला दुसरा सामना खेळण्यासाठी सज्ज झाली आहे. अफगाणिस्तानसमोर या दुसऱ्या सामन्यात गतउपविजेता दक्षिण आफ्रिकेचं आव्हान असणार आहे. याच दक्षिण आफ्रिकेने अफगाणिस्तानला गेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत पराभूत करत अंतिम फेरीत धडक दिली होती. त्यामुळे आता अफगाणिस्तानकडे 2 वर्षानंतर उपांत्य फेरीतील पराभवाची परतफेड करण्याची संधी आहे. तर न्यूझीलंड आपली विजयी घोडदौड कायम राखुन सलग दुसरा विजय मिळवण्यासाठी मैदानात उतरणार आहे. अशात या सामन्यात कोण मैदान मारतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आह

न्यूझीलंडने 8 फेब्रुवारीला अफगाणिस्तानवर 5 विकेट्सने मात केली होती (cricket) न्यूझीलंड अफगाणिस्तानकडून विजयासाठी मिळालेलं 183 धावांचं आव्हान हे 17.5 ओव्हरमध्ये पूर्ण केलं होतं. त्यामुळे आता अफगाणिस्तानला सुपर 8 मध्ये पोहचायचं असेल तर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध विजय मिळवावा लागणार आहे. अफगाणिस्तानने हा सामना गमावल्यास त्यांची सुपर 8 फेरीची वाट बिकट होईल. तसेच दक्षिण आफ्रिकेचा विजयासह सुपर 8 चा दावा आणखी मजबूत होईल. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव झाल्यास अफगाणिस्तानला सुपर 8 फेरीपर्यंत पोहचण्यासाठी उर्वरित सामन्यात मोठ्या फरकाने विजय मिळवण्याची वेळ येईल. त्यामुळे अफगाणिस्तानसाठी हा सामना करो या मरो अशा पद्धतीचाच झाला आहे, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तान विरुद्ध अजिंक्यआतापर्यंत दक्षिण आफ्रिका विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यात एकूण 3 टी 20i सामने खेळवण्यात आले आहेत. दक्षिण आफ्रिकेने या तिन्ही सामन्यात अफगाणिस्तानवर विजय मिळवला आहे. त्यामुळे आकड्यांबाबत दक्षिण आफ्रिका अफगाणिस्तानवर वरचढ असल्याचं स्पष्ट होतं.

हेही वाचा :

हम दो, हमारे दो दर्जन… ओवैसींच्या पक्षाच्या नेत्याचा नारा, दिलं अजब कारण; देशभर चर्चा

प्रार्थना बेहेरेने सांगितलं मुंबई सोडण्याचं कारण, खुलासा करत म्हणाली- अनेकदा तिथे….

IND vs PAK सामन्यासाठी बांगलादेशचा भारताच्या बाजूने कौल, तर पाकिस्तानने ठेवल्या तीन अटी