7 फेब्रुवारीपासून व्हॅलेंटाईन वीकला सुरुवात झाली असून 14 फेब्रुवारीला प्रेमाचा (love) दिवस साजरा केला जाणार आहे. प्रत्येक जण हा खास दिवस आपल्या पद्धतीने सेलिब्रेट करत असतो. कोणी आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी भेटवस्तू देतो, तर कोणी खास डेटचं प्लॅनिंग करतं. या दिवसांसाठी कपडे, दागिने, ॲक्सेसरी खरेदी करण्यावर भर दिला जातोच, पण त्यासोबतच आकर्षक दिसण्यासाठी त्वचेची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं ठरतं.

व्हॅलेंटाईन डे जवळ येत असताना त्वचा निरोगी, तजेलदार (love) आणि चमकदार दिसावी यासाठी योग्य स्किन केअर रूटीन पाळणं गरजेचं आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेण्याची दिनचर्या अजिबात टाळू नये. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा दोनदा स्वच्छ करावा. त्वचेच्या प्रकाराला साजेसा फेसवॉश वापरून चेहरा धुवावा आणि त्यानंतर क्लींजिंग मिल्कचा वापर करावा. यानंतर टोनर आणि मॉइश्चरायझर लावणं आवश्यक आहे. त्वचारोगतज्ज्ञांच्या सल्ल्याने योग्य सीरम निवडून ते रोज झोपण्यापूर्वी लावल्यास त्वचा अधिक निरोगी दिसू लागते.
व्हॅलेंटाईन डेला (love) अजून काही दिवस शिल्लक असल्यामुळे या काळात त्वचेचं एक्सफोलिएशन करणंही फायदेशीर ठरू शकतं. हलक्या स्क्रबचा वापर करून त्वचेवरील मृत पेशी काढून टाकता येतात आणि छिद्र स्वच्छ होतात. केवळ चेहऱ्यापुरतीच नव्हे, तर हात आणि पायांच्या त्वचेची देखील योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. हात-पाय स्क्रब करून स्वच्छ करावेत आणि त्यानंतर मॉइश्चरायझर लावावा, जेणेकरून त्वचा मऊ आणि उजळ दिसेल.
दरम्यान, व्हॅलेंटाईन डेसाठी नैसर्गिकरित्या चमकदार आणि तेजस्वी त्वचा मिळवण्यासाठी (love) एक खास घरगुती फेसपॅक उपयोगी ठरू शकतो. या फेसपॅकमधील घटकांचा वापर शतकानुशतके स्किन केअरसाठी केला जात असून त्यामुळे त्वचेवर कोणतेही दुष्परिणाम होण्याची शक्यता कमी असते. हा फेसपॅक तयार करण्यासाठी बेसन, दही, हळद, गुलाबपाणी आणि चंदन पावडर यांचं मिश्रण करून गुळगुळीत पेस्ट तयार केली जाते.
हा नैसर्गिक फेसपॅक (love) रोज किंवा एक दिवसाआड लावता येतो. चेहऱ्यापासून मानेपर्यंत फेसपॅक लावून तो 20 ते 25 मिनिटे ठेवावा. फेसपॅक सुकल्यानंतर गोलाकार हालचालीत हलक्या हाताने चेहरा धुवावा. फेसपॅक काढताना थोडंसं दूध वापरल्यास त्वचा अधिक मऊ आणि उजळ दिसते. या साध्या आणि नैसर्गिक उपायांनी व्हॅलेंटाईन डेला तुम्ही नक्कीच अधिक सुंदर आणि आत्मविश्वासपूर्ण दिसू शकता.
हेही वाचा :
आधावरचा पत्ता नाव किंवा ई-मेल चुकलाय? हे App डाउनलोड करा अन् मिनिटांत चुका करा
अजित पवार यांच्या आठवणीत मुलगा जय पवार भावूक; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
‘या’ जन्मतारखेला जन्मलेली लोक प्रचंड नशीबवान असतात; गुरू ग्रहाची असते मोठी